चुकीच्या गटाचे रक्त दिल्याने बाळंत महिलेचा मृत्यू, पंढरीत खळबळ.
चुकीच्या गटाचे रक्त दिल्याने बाळंत महिलेचा मृत्यू, पंढरीत खळबळ.
पंढरपूर (प्रतिनिधी)_
पंढरपूर तालुक्यातील आढीव या गावातील आरती सुरज चव्हाण ही महिला डिलिव्हरीसाठी पंढरपूर शहरातील नामांकित असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीच्या उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल करण्यात आले होते.. डिलिव्हरी होवून महिलेला मुलगा झाला.. पण डॉक्टरांनी पेशंट आरती चव्हाण यांना रक्ताची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. रक्तपेढीमधून रक्त आणण्यासाठी सांगितले असता.. नातेवाईकांनी श्री स्वामी समर्थ नावाने पंढरपूरमध्ये असलेल्या ब्लड बँकेत गेले असता नातेवाईकांनी ओ बॉम्बे या रक्तगटाची मागणी केली असता... रक्तपेढीतील संबंधित डॉक्टरांनी ब्लड दिले पण ते ओ बॉम्बे नसून फक्त ओ गट असलेले रक्त देण्यात आले...यानंतर नातेवाईकांनी ब्लडबँकेतून दिलेले रक्त घेऊन मोहिते हॉस्पिटलला येऊन संबंधित डॉक्टरांकडे ब्लड पिशवी देण्यात आली असता.. डॉक्टरांनी देखील तो रक्तगट चेक न करता आरती चव्हाण या पेशंटला रक्त पुरवठा करण्यात आला.. यावेळी काही मिनिटांनी त्या महिलेला वेदना सुरू झाल्याचे दिसून आले.. नातलग यांनी डॉक्टरना तशी कल्पनाही दिली मात्र त्याहीवेळी डॉक्टरांनी लक्ष न देता तब्बल एका तासानी येऊन चेक केला असता.. चुकीचा रक्तगट असलेला रक्त पुरवठा केला असल्याचा सारा प्रकार उघडकीस आला.. त्यानंतर सबंधित डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर या ठिकाणी पाठवण्यात आले मात्र काही वेळानी त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आलं.. महिलेच्या डिलिव्हरी झालेला मुलगा नवजात अपत्य चिमुकल्यावर नवजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.. ही घटना सोलापूरसह पंढरपूर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली या घटनेने संपूर्ण पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे...
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment