कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वक्तृत्व आणि कलोत्सव स्पर्धेचे आयोजन.
कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने विवेकानंद जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा व कलोत्सव २०२६ चे आयोजन!
पंढरपूर ( प्रतिनिधी)
गेली अठरा वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पंढरीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून प्रतिवर्षी विवेकानंद जयंती निमित्त वक्तृत्त्व स्पर्धेचे व कलोत्सव २०२६ च्या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सदर स्पर्धा विविध शालेय गटात घेतल्या जाणार आहेत. रोख रक्कम, संस्थेचे मानचिन्ह, सहभाग प्रमाण पत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. सदर स्पर्धा दिनांक ९जानेवारी,१०जानेवारी व ११ जानेवारी २०२६ रोजी पांडुरंग भवन, कालिका देवी चौकाजवळ व आदर्श प्राथमिक विद्यालय येथे संपन्न होणार आहेत.
वक्तृत्त्व स्पर्धेचे विषय व गट या प्रमाणे
अ गट--इयत्ता १ली ते ५वी
१) माझी शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा २) स्वामी विवेकानंद ३) माझे बाबा ४) माझे आवडते कार्टून ५) माझे गाव ६) माझा आवडता खेळ
ब गट--इयत्ता ६ वी ते १० वी
१) स्वच्छ भारतअभियान एक जनआंदोलन२) मला आवडलेले विवेकानंद ३) देशभक्त राजगुरु
४) माझ्या स्वप्नातील भारत ५) माझी आवडती कला ६) आरोग्य हीच खरी संपत्ती.
क गट--इयत्ता १२वी ते खुला गट
१) पुरस्कारांचा बाजार की खरेच प्रोत्साहन
२)स्वा.सावरकरांची मार्सेलीस समुद्रातील ऐतिहासिक उडी ३) अखंड भारताचे प्रणेते -सरदार वल्लभभाई पटेल ४) स्पर्धा आणि संधी यात अडकलेला युवावर्ग ५) भारतीय परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ६) शिवरायांचे सागरी आरमारी धोरण ७) वृध्दाश्रम -एक सामाजिक कलंक की काळाची गरज? ८) ए. आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) व आपला भविष्यकाळ ९) भारतीय लोकशाही समोरील आव्हाने.
तसेच या सोबतच सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, विविध वेशभूषा याही स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.सदर स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कर्मयोगी सभागृह, पंढरपूर अर्बन को. ऑप. बॅंक खवाबाजार शाखा येथे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलासाधनाचे अध्यक्ष श्रीकांत प्रभाकर बडवे महाजन यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक परिचारक, ज्ञानेश्वर मोरे, डॉ. कैलाश करांडे, अमरसिंह चव्हाण सर, अभियंता राजेंद्र माळी साहेब, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, अक्षय अनिरुद्ध बडवे, डॉ. किरण बहिरवाडे, अभिराज बडवे, प्रा. राजेंद्र मोरे, राजकुमार शहा, प्रा. मंदार परिचारक, राजकुमार आटकळे, बसवराज बिराजदार, महेश अंबिके, डॉ. बसवराज सुतार, डॉ. आनंद भिंगे, अमृतभाई शहा, अनंता नाईकनवरे, महेश देशपांडे, नारायण बडवे, सौ. मंदाकिनी देशपांडे, डॉ. सौ. मैत्रेयी केसकर, सौ. प्रतिभा यादव, सौ. आरती बोरखेडकर, सौ. वैष्णवी देशपांडे, सौ. गौरी देशपांडे, अशोक आवताडे सर, संतोष कुलकर्णी सर, अनिरुध्द बडवे पाटील , वा. गो. भाळवणकर सर, प्रा. सी. जी. जगताप सर, सौ. सारिका कोठाडिया आदी कलासाधनाचे सदस्य विशेष प्रयत्नशील आहेत.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment