लाइफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जगप्रसिद्ध लॅप्रोस्कोपीसर्जन डॉ शैलेश पुणतांबेकर यांची सेवा, आज रविवारी केल्या दुर्मिळ शस्त्रक्रिया.


 लाइफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जगप्रसिद्ध लॅप्रोस्कोपीसर्जन डॉ शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध,

आज रविवारी केल्या दुर्मिळ शस्त्रक्रिया.

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील सुप्रसिद्ध लाइफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये जगप्रसिद्ध लॅप्रोस्कोपी कॅन्सर रोबोटिक सर्जन 

डॉ शैलेश पुणतांबेकर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी येणार असून सर्व प्रकाराच्या शस्त्रक्रिया, आरोग्य विषयक सल्ला केल्या जाणार आहेत,

अशी माहिती पुणे येथील सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपी कॅन्सर व रोबोटिक सर्जन डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांनी रविवार दि.७डिसेंबर रोजी लाइफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

ते म्हणाले सर्व प्रकारचे कॅन्सर, आणि थायरॉईड , गर्भाशय पिशवीच्या शस्त्रक्रिया या चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे केल्या जातात,

आज रविवारी पाच शस्त्रक्रिया केल्या असून साडे तीन किलो वजन असलेला गोळा पोटातून काढण्यात आला.

लाइफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आय सी यु, सी टी स्कॅन, ऑन्कॉलॉजी , न्यूरो सर्जन या सर्व सुविधा असून अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, उत्तम स्टाफ उपलब्ध आहे. चांगली वास्तू आणि उत्तम टेक्नॉलॉजी असली की उत्तम गोष्टी घडतात,

२००८साली आम्ही पुण्यात प्रथम रोबोटिक सर्जरी केली, आता १६वर्षे झाली,

पाच पैकी एका महिलेस जन्मता गर्भाशयाची पिशवी नसते पण अंडाशय असते. 

मात्र या महिलांना मूल होत नाही,

पुण्यात आम्ही ४५वर्षाच्या मातेची पिशवी तिच्या २८वर्षीय मुलीस दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून बसवली , २०१८साली तिला मुलगी झाली, रोबोटिक सर्जरी म्हणजे मशीन ने केलेली सर्जरी यात सर्जरी सर्जन करीत असतो पण कापाकापी रोबो करीत असतो, आणि मशीन कधीच चुकत नसते, कॅन्सर असेल तर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ऑपरेशन करता येते मात्र तिसरा आणि चौथा टप्पा असेल तर केमोथेरपी आणि रेडिएशन केले जाते, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी चाळीस पट मोठे दिसते, त्यामुळे ही सर्जरी सुरक्षित आहे, सर्व सर्जन कडे कौशल्य असेलच असे नसते.

अशी माहिती त्यांनी दिली, यावेळी लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ संजय देशमुख व डॉ मंजुषा देशमुख यांनी बुके देऊन डॉ शैलेश पुणतांबेकर यांचे स्वागत केले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.