राजकीय पाठबळ किंवा पैसे नसतानाही निवडून आलेला ओंकार जोशी.


 पत्रकाराचा मुलगा झाला नगरसेवक,कोणतेही राजकीय पाठबळ किंवा पैसे नसतानाही निवडून आलेला अपक्ष उमेदवार ओंकार जोशी, माजी आमदार बाबुराव जोशी यांचा वारसा चालवणार.

प्रतिनिधी पंढरपूर _पंढरपूर येथील नगरपालिका निवडणुक अत्यंत अटीतटीची आणि अविश्वसनीय धक्कादायक निकाल असलेली ठरली,

या सगळ्या रगाड्यात प्रभाग क्रमांक पाच ब मधून निवडून आलेल्या ओंकार जोशी यांनी अत्यंत संयम आणि केवळ स्वतःच्या बळावर अपक्ष म्हणून ही निवडणूक जिंकली आहे,

कोणाचेही राजकीय पाठबळ किंवा पैसे नसतानाही त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

माजी आमदार,स्वातंत्र्यसैनिक कै. बाबुराव जोशी यांचा पणतू आणि पत्रकार अभय जोशी यांचे सुपुत्र ओंकार जोशी हे वकील आहेत,

लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असलेल्या ओंकार याने कोरोना काळात तसेच महापूर आला तेव्हा प्रभागातील जनतेसाठी जोखीम पत्करून शक्य ती मदत केली, नगरसेवक व्हायचे हे अनेक दिवसापासूनचे त्याचे स्वप्न होते, सुरुवातीला भाजप कडे जाऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तिकीट मागितले, मात्र त्यांच्या निकषात न बसल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवायचे ठरविले,

लोकांनीही आपल्या घरातील मुलगा म्हणून त्याला साथ दिली, होम टू होम, जाऊन प्रचार केला, त्याने प्रचाराची रिक्षासुद्धा फिरवली नाही गोविंदपुरा, हरिदास वेस, सहकार चौक विणे गल्ली, बाराभाई तालीम या भागातील मतदारांनी मोठा प्रतिसाद देत निवडून आणले, ओंकार जोशी यांचे सर्व सहकारी उच्च शिक्षित आणि निर्व्यसनी आहेत. ओंकार जोशी म्हणाले, दैनदिन जीवनातील लोकांच्या अपेक्षा खूप छोट्या असतात, रस्ते,पाणी, वीज, ड्रेनेज यावर गैरसोय होणार नाही आणि न पा सभागृहात लोकांच्या प्रश्नावर वाचा फोडणार असल्याचे मत व्यक्त केले.

या प्रक्रियेत त्याला त्याचे दोन्ही मामा डॉ मिलिंद आणि मंदार जोशी, काका डॉ अनिल जोशी, आई सौ माधुरी जोशी आणि वडील पत्रकार अभय जोशी यांनी अत्यंत मेहनत घेऊन यश मिळवून दिले,

ओंकार यांच्या पुढील कारकिर्दीस गोफण परिवाराच्या वतीने शुभेच्छा.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.