पंढरपूर की गुंडापूर.


 आमच्या पंढरपुरामध्ये काय स्वस्त आहे? 

माणसांचा जीव! 


काल संध्याकाळी कुंभार गल्ली या ठिकाणी एका घरामध्ये आई आणि मुलाची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या झाल्यानंतर संपूर्ण पंढरपूर मध्ये खळबळ उडाली 


अशा पद्धतीने आई आणि मुलाला मारून टाकणं मला वाटतं पंढरपुरातील ही पहिलीच घटना असावी 

यामागे कारण काय आहेत हा विषय आत्ता होऊ शकत नाही 

ज्यांनी कुणी हे कृत्य केलं असेल ते सापडल्यानंतरच त्या कारणाची मीमांसा होणार आहे 

वास्तविक बऱ्याच वेळा पुरुषां पुरुषांच्या मध्ये वाद होऊन खुनाचे प्रकार घडत असतात 

पण यामध्ये एका आईचा म्हणजेच एका महिलेचा जीव गेलेला आहे ही सगळ्यात दुर्दैवी घटना आहे 

तसं पंढरपूरमध्ये गुन्हेगारी जगत हे कुणालाच नवीन नाहीये 

80 च्या दशकामध्ये एक टोळी युद्धाला तत्कालीन महासंचालक अरविंद इनामदार तेरकर साहेब कुलकर्णी साहेब यांनी संपवल होतं 

त्यानंतर डीवायएसपी म्हणून ट्रेनिंग संपल्या संपल्या पंढरपूरची जबाबदारी तत्कालीन अधिकारी डॉक्टर श्री भूषण कुमार उपाध्याय यांनी घेतली, साहेबांनी पंढरपूर वरती एवढा वचक बसवला होता की साहेब पोलीस स्टेशन मधूनच चालत निघायचे साहेब निघाले आहेत हे जरी कळलं तरी उडाणटप्पू लोक दिसेल त्या बोळामध्ये लपून बसायचे एवढी दहशत डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांची होती आणि खऱ्या अर्थाने त्यांनी पंढरपूरला मात्र वळण लावलं कधीही गोरगरिबाला त्रास झाला नाही त्यांच्या अगोदर विक्रम बोके साहेब यांनी देखील अशाच पद्धतीने उडानटप्पू गावगुंडांना गुडघ्यावरती चालत पोलीस स्टेशनला नेलं होतं प्रकाश चव्हाण देखील अशाच पद्धतीचे अधिकारी होते जे कुठल्याही नेत्याला भीत नव्हते आणि मारत असताना कोणाचा विचारच करत नव्हते पण साधारण 90 92 नंतर एकही खमक्या अधिकारी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला किंवा सोलापूर जिल्ह्याला मिळाला नाही त्याची कारण अनेक असू शकतात पण गुन्हेगारी जगतावरचं वर्चस्व किंवा दहशत संपवण्यासाठी तसे अधिकारी सुद्धा पंढरपूरला यावे अशी अनेक लोकांची इच्छा आहे

 पंढरपूर अतिशय शांत गाव म्हणून ओळखलं जात होतं 

परंतु मधल्या काळानंतर पंढरपूर मध्ये गुन्हेगारीने एवढं प्रचंड डोकं वर काढलं की या खून आणि हत्या प्रकरणांमध्ये जे सुपारी घेतात त्या मुलांची वय साधारण 16 ते 21 च्या दरम्यानची आहेत 

तसं पंढरपूरमध्ये पैसा सहज उपलब्ध आहे 

पंढरपूर मध्ये कोणी उपाशी मरत नाही, 

वाळू दारू आणि इतर अवैधन्यातून पंढरपूरमध्ये प्रचंड पैसा बिना कष्टाचा लवकर मिळतो 

आणि त्यातून व्यसन निर्माण झाल्यानंतर अनेक वेळा खून दरोडे खंडणी या गोष्टी घडतात 

आमच्या पंढरपूर मध्ये बदली करून घेण्यासाठी मग ती कुठल्याही विभागाची असू दे 

वरती पैसे दिल्यानंतर मग ते पंढरपुरातन गोळा कसे करायचे याचा जास्त विचार अधिकाऱ्यांना पडलेला असतो 

त्यामुळे गावातील गुन्हेगारी वरती किंवा जे लोक चिंधी चोर आहेत त्याचबरोबर छोट्या-मोठ्या सोऱ्यामाऱ्या हाफ मर्डर यामध्ये आहेत त्यांच्यावरती कुणाचाही कंट्रोल नाही 

माजी आमदार स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील त्याचबरोबर माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मालक 

हे ज्यावेळी पंढरपूर मध्ये आमदार म्हणून काम करत होते या दोघाही दिग्गजांनी कधीही पंढरपूरच्या कुठल्याही अवैध कामांमध्ये लक्ष घातलं नाही त्याचबरोबर पोलीस स्टेशनला पकडून नेलेल्या गुन्हेगाराला कधीही पाठीशी घातलं नाही वास्तविक त्यांनी पोलीस स्टेशनला कधी कुणासाठी फोन केले नाहीत पोलीस स्टेशनच्या कामांमध्ये कधी हस्तक्षेप केला नाही 

पण सध्या विविध संघटना विविध संस्था त्याचा चेअरमन ह्याचा चेअरमन त्याचबरोबर गावातील इतर सो कॉल्ड नवीन तयार होणारी जमात यातील कोणीही पोलीस स्टेशनला फोन करून गुन्हेगारांना सोडवण्यासाठी पुढे असतात 

यामध्ये मी पोलीस प्रशासनाला दोष देणार नाही 

याचं कारण असं यापूर्वी ही पोलीस स्टेशन होतं पोलीस प्रशासन आहे त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे परंतु एखाद्या गुन्हेगाराला मारल्यानंतर अनेक संघटना पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन बसतात अशावेळी पोलिसांना जर वरून फोन येत असतील तर त्यावेळी पोलिसांचा नाईलाज होतो 


त्यामुळे अलीकडं पोलीस प्रशासन देखील दूध पोळलं तर तर ताक फुंकून पिल जातं या पठडीत आहेत 

गुन्हेगाराची दिंड काढणे गुन्हेगाराला अर्ध नग्न फिरवणे या गोष्टी पोलीस प्रशासन करू शकत परंतु बऱ्याच वेळा पोलिसांचे देखील हात बांधलेले असतात त्यांची स्वतःची इच्छा असून देखील ते काही करू शकत नाही 

यासाठी गृहमंत्रालयाकडूनच कायद्यात बदल होणं आवश्यक आहे तरच गुन्हेगारी वरती आळा येईल 

वास्तविक पंढरपुरातल्या वाळू प्रकरणावरती अनेक खून पडलेले आहेत याच्यावरती राज्य शासन कधीच विचार करत नाही 

कालचा जो खून झाला तो कशामुळे झाला हा विषय फार नंतरच आहे पण पंढरपुरातील उपनगरांमध्ये राहणाऱ्या अनेक लोकांना या गोष्टीची आता प्रचंड दहशत बसलेली आहेत घरामध्ये जर कुटुंब एक दोन माणसे एकटी असतील तर हे प्रकार होऊ शकतात यासाठी योग्य ती नियोजन व्यवस्था पोलीस प्रशासनाने करणे आवश्यक आहे 

नुकताच एक कळलेला आहे की नवीन डी वाय एस पी साहेब येतात श्री प्रशांत डेंगळे 

वास्तविक भागवत धर्माची पताका भागवत धर्माचा विचार आणि आध्यात्मिक नगरी असलेल्या पंढरपूरची पंढरी ही गुन्हेगारी जगतात रूपांतरित झालेली आहे आणि त्या संदर्भातली आव्हान नवीन साहेबांच्या पुढे असणार आहेत 

साहेबांनी किती स्वतंत्र पणाने निर्णय घ्यायचे हा त्यांचा विषय आहे 

पण मला यावरून एवढेच सांगावसं वाटतं की पंढरपुरातल्या लोकांचा जीव अतिशय स्वस्त झालेला आहे 

अनेक हद्दवाढ भागामध्ये अनेक उपनगरांमध्ये रात्रीच्या वेळी दरोडा पडणे घर फोडणे रात्री उशिरा जर महिला कामावरून येत असेल तर त्यांची छेडछाड होणे या गोष्टी सातत्याने होत राहतात 

पण याकडे फार गंभीरतेने पाहिलं जात नाही आणि मग त्यातूनच असे हत्येचे प्रकार घडतात 

पंढरपूर मध्ये वाळू सोडली तर दुसरीकडे काम करण्यासाठी कोणतीही मोठी इंडस्ट्री किंवा प्रोजेक्ट नाही 

त्यामुळे तरुण पिढी जेवढा लवकरात लवकर पैसा मिळेल त्या व्यवसायामध्ये जात आहे आणि त्यातूनच ती गुन्हेगारीकडे वळत आहे 

साधारण 17 ते 21 वर्ष वयाच्या पोर टू व्हीलर चालवत असताना ट्रिपल सीट जात असताना अनेक महिलांना धक्का देणे महिलांना पाडणे पोरींचा पाठलाग करणे या गोष्टी करत असतात हे सर्व डोळ्याला दिसत असतं परंतु या पोरांना जर अडवलं तर ही पोर अनेक वेळा पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना अतिशय गलिच्छ भाषेत शिव्या देत असतात याचे व्हिडिओ देखील माझ्याकडे आहेत 

कानामध्ये बाली केसाचा सरडाकट, अंगावर 20 किलोचा मास 

स्वतःला बॉडी बिल्डर त्याचबरोबर भावी नगरसेवक समजणारी अशी जमात सध्या पंढरपुराच्या गल्लीबोळातून आहे 


आपल्याला पकडल्यानंतर आपल्याला आपल्यावरचा कोणीही सोडू शकतो हा एक भ्रम या नवीन पिढीमध्ये निर्माण झालेला असला कारणाने त्यांना कायदा आणि पोलीस प्रशासनाची भीती उरली नाही 

साठ दिवसाच्या आत जामीन होतो ही गोष्ट माहित असल्याने सदर पिल्लावळ यांना कष्ट करून पैसे कमवण्यापेक्षा गुन्हेगारी जास्त जवळची वाटते 


पंढरपूर पोलीस प्रशासनामध्ये सध्या डीबी विभागामध्ये जे दोन-तीन काम करणारे चांगले अधिकारी होते ते सध्या तिथं काम करत नाहीत वास्तविक हा पोलीस खात्याचा अंतर्गत विषय आहे परंतु कालच्या खून झालेल्या  घटनेचा सुगावा निश्चित या कर्मचाऱ्यांनी लावला असता 

कारण पंढरपुरातील अनेक गुन्ह्याचा शोध या लोकांनी लावलेला आहे 

पोलीस प्रशासनापुढे सगळ्यात मोठा आव्हान आहे की ही हत्या कोणी केली आणि त्याचा छडा लावण ही फार मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे त्यासाठी डीबी मध्ये त्या पद्धतीने काम करणारीच माणसं लागतात 

असो एकंदरीत कालच्या हत्येच्या प्रकरणावरन पंढरपुर वरती कुणाचीही दहशत उरलेली नाही फक्त चोरांची भुरट्या गुंडांची दहशत उरलेली आहे हे यातून स्पष्टच होतं 


राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, 

आपण एकादशीच्या दिवशी पंढरपूरला येऊन गेला 

पंढरपुरातील उपनगरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना आपण सुरक्षितता देऊ शकाल का? 

कारण आज मंदिर परिसरातील अनेक कुटुंब ज्या घरांमध्ये छोटी मुलं वृद्ध माणसं तरुण व्यक्ती या सुरक्षित राहत आहेत अशा लोकांना उपनगरात पाठवून त्यांच्या जीवाशी खेळ खेळणं हे योग्य होणार नाही 


पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे बाहेरून येणारा भाविक अशा घटनेमुळे भयभीत होतो आणि या माध्यमातून पंढरपूरची बदनामी ही संपूर्ण देशात होते 

विशेष बाब म्हणून आपण हिवाळी अधिवेशनामध्ये पंढरपूरसाठी एखादं चांगलं स्कॉड तयार करावं ज्याच्यामध्ये कोणताही नेता आमदार खासदार मंत्री हस्तक्षेप करणार नाही अशा पद्धतीचे निर्देश आपण दिल्यास आणि पंढरपूरची एकूण गुन्हेगारीची परिस्थिती आपण समजून घेतल्यास निश्चितपणे पंढरपूर पुन्हा एकदा शांततेच्या व्यवस्थे खाली येईल अन्यथा आम्ही तर डोळ्यांनी पाहतो की कुणीही कुणाचा खून कधीही करू शकतो

कोणालाच कुणाची भीती राहिलेली नाही ही परिस्थिती पंढरपूरची आहे 


आपण सोलापूरचे सीपी ग्रामीणचे एसपी नवीन येणारे डी वाय एस पी या सर्वांना सूचना कराव्यात आणि पंढरपूर हे शांततेच्या मार्गाने जगणार गाव आहे येणाऱ्या भाविकांच्या वरती जगणार गाव आहे त्यांच्याकरता  किमान पोलीस प्रशासनाला क्डक राहण्याचे निर्देश द्यावेत आणि ज्या कुठल्या सामाजिक संघटना किंवा नेते फोन करतील त्यावेळेस आपण या संदर्भात पोलीस प्रशासनाला स्वतंत्र निर्णयाचे अधिकार द्यावेत 


डॉ प्राजक्ता बेणारे

जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापूर ग्रामीण पूर्व वास्तव्य पंढरपूर

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.