आषाढी वारी मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले १०कोटी ८४लाख रुपयांचे उत्पन्न.


 श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास आषाढी यात्रेत 10 कोटी 84 लाखाचे उत्पन्न,


पंढरपूर दि.12 :- आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 10 कोटी 84 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर  यांनी दिली.


यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. आषाढ शुध्द 01 (दिनांक 26 जून) ते आषाढ शुध्द 15 (दिनांक 10 जुलै) या कालावधीत  भाविकांनी  श्रींच्या चरणाजवळ  7505291 रुपये अर्पण, 28833569 रुपये देणगी, 9404340 रुपये लाडू प्रसाद विक्री, 4541458 रुपये भक्तनिवास, 14471348 रुपये हुंडीपेटी, 3245682 रूपये परिवार देवता तसेच 25961768 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 1245075 रुपये व 3 इलेक्ट्रिक रिक्षा /बस चे 32 लक्ष इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. 



मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 7706694 रुपये अर्पण, 26922578 रुपये देणगी, 9853000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 5060437 रुपये भक्तनिवास, 9355073 रुपये हुंडीपेटी, 3179068 रूपये परिवार देवता तसेच 22153601 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 628109 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.


सन 2024 च्या आषाढी यात्रेत रू. 84858560/- व या वर्षीच्या यात्रेत रू. 108408531/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू. 23549971/- इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री  यांनी सांगीतले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.