पांडुरंग भवन येथे पोलिस बांधव, पत्रकार यांना मिष्टान्न मेजवानी.
*पंढरीतील आषाढी वारीत अविरत कष्ट घेणा-या पोलीस बांधवांचा व पत्रकार बंधूंना मिष्टान्नाची मेजवानी देऊन,श्रीपांडुरंग अन्नछत्र मंडळाच्या वतीने गौरव.
पंढरपूर (प्रतिनिधी)
प्रतिवर्षी आषाढी यात्रेत अहोरात्र कष्ट करुन, घरापासून लांब असणाऱ्या पोलीस बांधवांना यात्रेची सांगता सुखद व्हावी या उदात्त हेतूने, श्रीपांडुरंग अन्नछत्र मंडळाचे वतीने अध्यक्ष श्री अनिरुद्ध बडवे पाटील व त्यांचे चिरंजीव अक्षय बडवे पाटील यांच्या वतीने मोफत मिष्टान्नाची मेजवानी देण्यात येते.
पंढरीतील श्री पांडुरंग भवन येथे आषाढी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ११ ते ४ यावेळेत हा उपक्रम मागील १० वर्षा पासून संपन्न करण्यात येतो. सामाजिक ऋण फेडण्यासाठी कटीबद्ध असणाऱ्या पितापुत्रांचे या सामाजिक योगदानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यावर्षी देखील रविवार दि १० रोजी या उपक्रमाची सुरुवात सर्व पत्रकार बंधू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली असल्याची माहिती मंडळाचे सचीव अक्षय बडवे यांनी विषद केली.
याप्रसंगी आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी विरेंद्र सिंह उत्पात, टीव्ही ९ चे प्रतिनिधी रविंद्र लव्हेकर, एबीपी माझा चे प्रतिनिधी सुनिल दिवाण, तसेच दै. तरुण भारतचे प्रतिनिधी महेश भंडारकवठेकर व चैतन्य उत्पात, मंदार लोहकरे, अतुल बडवे, सा.धन्यवाद चे संपादक शंकर कदम, पत्रकार कोरे , राजकुमार शहापुरकर, यांचा सन्मान अनिरुद्ध बडवे पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
फोटो लाईन-पोलीस बांधवांना देण्यात येणाऱ्या मोफत मिष्टान्न उपक्रमाचे उद्घाटन करताना अनिरुद्ध बडवे पाटील, अक्षय बडवे पाटील, श्रीकांत बडवे महाजन व इतर मान्यवर.
संपादक.
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment