कर्मयोगी कॉलेज च्या शिरपेचात मानाचा तुरा, डॉ अभय उत्पात यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड.


 *कर्मयोगीच्या शिरपेचात मानाचा तुरा*.


*डॉ. अभय उत्पात यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती.

पंढरपूर (प्रतिनिधी)

कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अभय उत्पात यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर (बोर्ड ऑफ स्टडीज) सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठामधील ( DBATU ) मेकॅनिकल इंजिनियरिंग, प्रॉडक्शन इंजिनियरिंग व ऑटोमोबाइल इंजिनियरिंग या तीन अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. अभय उत्पात यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठामधे महाराष्ट्रातील जवळपास शंभरहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये संलग्न आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या तंत्र विद्यापीठात कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या डॉ. अभय उत्पात यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे औद्योगिक क्षेत्र व शैक्षणिक अभ्यासक्रम यामधील दरी कमी करून औद्योगिक क्षेत्राला पूरक असा अभियांत्रिकी अभ्यासक्रम आमलात आणण्याची संधी मिळाली आहे असे डॉ. अभय उत्पात आवर्जून संगितले. सध्या डॉ. अभय उत्पात हे कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे संशोधन अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत.     

श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.राहुल पांचाळ, विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दिपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक यांनी डॉ. उत्पात यांच्या निवडीसाठी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.