फॅबटेक फाउंडेशन व भाऊसाहेब रूपनर यांच्या वतीने पत्रकार बांधवांना रेनकोट वाटप.
*फॅबटेक फाउंडेशन व भाऊसाहेब रूपनर यांच्या वतीने पत्रकार बांधवांना रेनकोट वाटप.*
पंढरपूर (प्रतिनिधी)
शिक्षणक्षेत्र आणि साखर उद्योगात अल्पावधीत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या फॅबटेक
या संस्थेच्या वतीने पंढरपूर येथे पत्रकार सुरक्षा समिती यांच्या सहकार्याने रेनकोट वाटप करण्यात आले.
शिक्षण सम्राट, उद्योगरत्न फॅबटेक फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चेअरमन भाऊसाहेब रूपनर आणि व्हॉईस चेअरमन सूरज रूपनर यांच्या सुयोग्य नियोजनाने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, त्यांच्या कामाला वेळेचे बंधन नसते, कोणत्या वेळेला कॅमेरा, मोबाईल घेऊन एखादी बातमी कव्हर करायला जावे लागेल हे सांगता येत नाही. ऊन, वारा,पाऊस अशा कशाचीही पर्वा न करता तसेच विपरीत नैसर्गिक वातावरण असूनही त्या ठिकाणी जाऊन वार्तांकन करण्यासाठी जावे लागते.
यामुळे पत्रकारांना अत्यंत आवश्यक असणाऱ्या रेनकोट ची गरज रूपनर यांनी पूर्ण केली.
समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले फॅबटेक फाउंडेशनचे चेअरमन भाऊसाहेब रूपनर व व्हॉईस चेअरमन सूरज रूपनर अनेक उपक्रमातून समाजसेवा करीत असतात, अनेक गोरगरीब लोकांचे कर्जावरील व्याज त्यांनी माफ केले, विविध सवलती देऊन कर्ज फेडण्यास लोकांना सहकार्य केले आहे. यावेळी पत्रकार सुरक्षा समिती चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे, पंढरपूर अध्यक्ष लखन साळुंखे, उपाध्यक्ष नागेश काळे, उद्योजक धडाडीचे युवा पत्रकार रफीक आतार, अविनाश साळुंखे, विठ्ठल जाधव ,बाहुबली जैन, पंढरपूर विभाग जिल्हा उपाध्यक्ष अशपाक देवळे, रामकृष्ण बिडकर, रवी शेवडे, प्रकाश इंगोले, चैतन्य उत्पात, राहुल रणदिवे, रोहित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी मनोगत व्यक्त केले, ते म्हणाले, समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या पत्रकार यांची दखल घेऊन भाऊसाहेब रूपनर यांनी संवेदनशील भूमिका व्यक्त केली आहे, समाजात त्यांचा आदर्श ईतर मोठ्या व्यक्तींनी घेतला पाहिजे,
युवा पत्रकार रफीक आतार म्हणाले, पत्रकाराच्या व्यथा समजून घेऊन रूपनर यांनी
मला वाटप करण्यासाठी रेनकोट दिले, भविष्यातही ते सहकार्य करणार आहेत.
आभार रवी शेवडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण बिडकर यांनी केले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment