वारीचा शीणवटा घालविण्यासाठी स्थानिकांची मनोरंजन नगरीकडे धाव, भाविकांसह स्थानिक लोकांची मोठी गर्दी.
वारीचा शीणवटा घालविण्यासाठी स्थानिकांची मिनी एस्सेल वर्ल्ड कडे धाव,
मनोरंजन नगरीतून होते लाखोंची उलाढाल.
पंढरपूर (प्रतिनिधी)
यंदाच्या वर्षी मे महिन्यापासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने आषाढी वारी उत्तम भरली आहे. अंदाजे १८ते २०लाख भाविक आले आहेत.
आषाढी वारीमध्ये बाल गोपाळासह अनेकाचे आकर्षण असलेले मिनी एस्सेल वर्ल्ड पंढरी नगरीत अवतरले असून ही मायावी अद्भूत मनोरंजननगरी हजारो भाविकांची पावले आपसूकच वळवत आहे.
दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये ही मायावी नगरी येते.
उंचच उंच आकाशपाळणा है सर्वांत आकर्षणाचा बिंदू असतो. इलेक्ट्रिक जनरेटरच्या शक्तीवर गोलगोल फिरणारा आकाशपाळणा जेव्हा उंचावर जातो त्यावेळी आसमंतातून स्वप्ननगरी पंढरपूर शहराने सौंदर्य अलौकिक असते.
रात्रीच्या वेळी तर पंढरी नगरीचा नजारा काही वेगळाच असतो,
हा आकाशपाळणा वेगाने खाली येतो तेव्हा पोटात गोळा येऊन अनेक नवखे घाबरून ओरडायला जागतात, आनंद, जोश, अनोजे थ्रिल अशा त्रिवेणी संगमाचा अनुभव माविकासह शहरवासीय अनुभवत आहेत. खिशाला परवडेल अशा माफक दरात विविध राईड्स असल्यानं गरीब, सर्वसामान्य ते अगदी श्रीमंत घरातील मंडळी याचा मुक्त आनंद
घेताना दिसतात.
पंढरपूर आषाढी वारीतील मनोरंजन वारीमध्ये उंच जाणाऱ्या आकाश पाळण्याचा आनंद घेताना भाविक,
घेताना दिसतात
गोलाकार आणि मधूनच तिरका होऊन फिरणारा मेरी गो राऊड, गोलात एकमेकाना धडकत जाणाऱ्या डॅशींग कार्स काळजाचा ठोका चुकत गोल मृत्युगोलात फिरणाऱ्या दोन वेगवान मोटारसायकल आणि एक मारुती कार, चिमुकल्यांचे आकर्षण असलेल्या पाण्यातील आगबोटी, मिनी ट्रेन, जीवनातल्या विविध समस्यांवर आपली भूमिका व्यक्त करणारे पन्नालाल गाढव, अनेक चित्र विचित्र प्रश्न विचारले की हे गाऊन प्रेक्षकांसमोर उभे राहते हा प्रकार अत्यंत विनोदी तेवढाच आफत आणणारा पण यातून मनोरंजन हाच एकमेव हेतू असतो. वारी झाली तरी पुढे पंधरा दिवस हे मिनी एसेल वर्ल्ड नागरिकांसह भाविकांचे मनोरंजन करते.
महिनाभर असते मनोरंजन वारी
आषाढी वारी आली की विविध व्यवसायाबरोबर मनोरंजन वारीचेही आगमन होत असते, अनेक व्यवसाय होताच निघून जातात परंतु म नोरंजन वारीतील पाहणे, रेल्वे व इतर व्यावसायिक महिनाभर हा व्यवसाय करतात. कारण वारी झाल्यानंतर पंढरीतील स्थानिक नागरिक या मनोरंजन वारीचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment