कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन.
कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दीपावली निमित्त किल्ला स्पर्धांचे आयोजन!
पंढरपूर (प्रतिनिधी)
गेली आठरा वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व इतिहासाचा प्रसार व प्रचार व्हावा या उदात्त हेतूने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेतल्या जाणार आहेत. शालेय गट इयत्ता पहिली ते दहावी असा असून दुसरा गट इयत्ता ११वीते पुढे असा राहील. दोन्ही गटात प्रथम क्रमांकास रोख रुपये ३००० +, संस्थेचे मानचिन्ह, दुस-या क्रमांकास रुपये २०००+संस्थेचे मानचिन्ह, तिसऱ्या क्रमांकास १०००रुपये + संस्थेचे मानचिन्ह व प्रत्येक सहभागींना सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दि २० ते २३ पर्यंत सदर स्पर्धा संपन्न होणार आहे.
तरी ज्यांना ज्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी https://forms.gle/gx1YDTTq7tA988Te9 ही लिंक ओपन करुन किंवा हा
क्यूआर कोड स्कॅन करुन ऑनलाईन फॉर्म भरावे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलासाधनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बडवे महाजन यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक परिचारक, सचिव ज्ञानेश्वर मोरे, या स्पर्धेचे कार्यकारी अध्यक्ष अमर चव्हाण सर, डॉ. कैलास करांडे, अभियंता राजेंद्र माळी साहेब, राजकुमार आटकळे, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, डॉ.किरण बहिरवाडे, अक्षय बडवे पाटील,अभिराज बडवे, प्रा. राजेंद्र मोरे, राजकुमार शहा, डॉ. बसवराज सुतार, डॉ. आनंद भिंगे, प्रद्युम्न कामठाणकर, बसवराज बिराजदार, महेश अंबिके , अमृतभाई शहा, अनंता नाईकनवरे, महेश देशपांडे, नारायण बडवे आदी कला साधनाचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. सदर स्पर्धेत जास्तीत स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment