कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये, वाचन प्रेरणा दीन, उत्साहात संपन्न.


 कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये "वाचन प्रेरणा दिन" उत्साहात संपन्न.

पंढरपूर (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रदर्शन.

प्रतिनिधी पंढरपूर 

 श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विविध पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

 यावेळी प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचनासाठी प्रोत्साहित केले. तसेच वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे असे सांगून त्यांनी 

दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर विशद केले.  भारताची खरी शक्ती ही युवकांमध्ये आहे. भारताला महासत्ता बनवण्याची ताकद ही युवकांमध्ये आहे. त्यामुळे डॉक्टर कलाम यांचे स्वप्न साकार करण्याची खरी जबाबदारी ही युवकांमध्ये आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे.

विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण होण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला गेला. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद पाहुन हे उद्दीष्ट सफल झाल्याचे समाधान देखील प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. अजित कणसे, उपप्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, रजिस्ट्रार  जी डी वाळके, विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा.दीपक भोसले,  संशोधन अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.राहुल पांचाळ व इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 महाविद्यालयाचे ग्रंथपाल सौ. आरती पालेकर सहाय्यक ग्रंथपाल गणेश एडगे तसेच चंद्रकांत घाडगे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.