श्री विठ्ठल भक्तांच्या भुकेची काळजी असणारा सुरज.


 श्री विठ्ठलभक्तांच्या भुकेची काळजी असणारा सुरज,

हटके, पदार्थांनी अल्पावधीत लोकप्रिय.

पंढरपूर (प्रतिनिधी)तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे रात्री उशिरा गावात येणाऱ्या भाविकांची पोटपूजा करून एका अर्थाने श्री विठ्ठलाच्या भाविकांची गैरसोय दूर करण्याचे पवित्र कार्य पंढरपूर येथील युवक सुरज गणपत कदम हा युवक करीत आहे,

ज्या वयात समवयस्क मुले तारुण्याची झिंग अनुभवत मनसोक्त बॅचलर लाईफ 

एन्जॉय करत असताना लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडलेला सुरज कदम अनोख्या व हटके अशा पदार्थांनी पंढरी नगरीत रात्री अपरात्री येणाऱ्या भाविकांची सोय करीत आहे, गावात मंदिर परिसर आणि स्टेशन रोड या भागात अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आहेत पण रात्री अकरा वाजता ती बंद होतात,

दक्षिण काशी पंढरपूर येथे वेळी अवेळी अनेक भाविक येत असतात, पण भोजन मिळत नसल्याने उपाशीच झोपावे लागते , अशा लोकांना सुरज याचे फिरते रेस्टॉरंट म्हणजे वरदानच आहे, चौफळा येथील पारिजात बुक स्टोअर समोर सुरज कदम रोज रात्री नऊ वाजता आपले फिरते रेस्टॉरंट घेऊन येतो,

मोटारसायकल मागे ट्रॉली किचन असून अनोखे जुगाड केले आहे, त्यातच सिलेंडर,शेगडी, पाण्याचा जार, ग्राहकांना बसायच्या खुर्च्या , डिश, काटे चमचे, बाऊल असतात.

त्याच्याकडे अख्खा मसूर,पावभाजी, मसाला पुलाव, पनीर रोटी, मॅगी चीज सँडविच ,विदर्भ दालबाटी आदी पदार्थ सुरज स्वतः तयार करतो,

गावातील स्थानिक लोकही बऱ्याचदा त्याच्या रेस्टॉरंट मध्ये येऊन रसना तृप्त करतात.

सुरज याला मुळातच स्वयंपाक आणि किचन ची आवड आहे. तो उत्तम पोळ्या बनवू शकतो.

२०२१सालापासून तो या व्यवसायात कार्यरत आहे,

पंढरपूर येथील तानाजी चौक येथे तो राहतो,२०१५साली अचानक त्याच्या वडिलांचे निधन झाले, बहिणीचे लग्न होऊन ती सासरी गेल्यावर आईची, घराची जबाबदारी सूरजच्या इवल्याशा खांद्यावर येऊन पडली, पण तो डगमगला नाही,

आपली आवड कशात आहे याचा विचार करून तो खवय्या रसिकांची तृप्ती करण्याच्या व्यवसायात आला, हे पदार्थ चाखल्यावर पुन्हा पुन्हा येणाऱ्या खवय्यांची संख्या मोठी आहे, गावातील बरेच ग्राहक सूरज कधी येतोय याची वाट पाहत असतात,

दररोज दुपारी दोन पासूनच तो तयारी सुरू करतो.

स्वतः बाजार आणण्यापासून कामे करतो, भाज्या स्वच्छ आणि फ्रेश असतात,

लोणावळा किंवा महाबळेश्वर अशा हिल स्टेशनवर स्वतःचे रिसॉर्ट उभे रहावे हे सुरज चे स्वप्न आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.