मुसळधार पावसामुळे तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने नदीकाठच्या रस्त्यांवर बंदोबस्त.
. मुसळधार पावसामुळे तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने नदीकाठच्या रस्त्यांवर बंदोबस्त.
पंढरपूर (प्रतिनिधि)
मागील गेल्या सात दिवसांपासून पंढरपूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून
पहाटे चार वाजल्यापासून भीमा नदी पात्रात सुमारे ५० हजार क्युसेस इतके पाणी सोडण्यात आले आहे,
यामुळे नदीकाठच्या रस्त्यांवरील वाहतूक धोकादायक बनली असुन नागरिकांच्या सुरक्षितता साठी तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पाण्याचा प्रवाह वेगवेगळ्या बंधाऱ्यातून सोडण्यात आल्यामुळे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडेवाडी हा पुल सुमारे चार फूट पाण्याखाली गेलेला आहे अजनसोन हा पूल सुमारे तीन फूट पाण्याखाली गेलेला आहे त्याचप्रमाणे जुना दगडी पूल सुमारे चार फूट पाण्याखाली गेलेला आहे सदर ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमण्यात आलेले असून तिन्ही पुलावर्ती लोखंडी व बांबूची बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे तिन्ही पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेले असून कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून सदर ठिकाणी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत
अशी माहिती तालुका पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली आहे.
राज्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे
पुणे सोलापूर राज्य महामार्गावर भिगवण , बारामती, इंदापूर येथे पावसाने हाहाकार माजविला आहे, एक इनोव्हा कार वाहून गेली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर परिसरात सतर्कता बाळगण्यात आली आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment