पंढरपूर येथे दीड लाख रुपये किमतीची अवैध गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त.


 पंढरपूर येथे दीड लाख रुपये किमतीची अवैध गोवा बनावटीची  विदेशी दारू जप्त. ऐन निवडणूक काळात  प्रकार उघडकीस आल्याने 

शहरात खळबळ.

 पंढरपूर(प्रतिनिधी )_पंढरपूर येथे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना इसबावी येथे एक लाख ४९हजार रूपये किंमत असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या बाटल्या सापडल्याने हा सर्व साठा शहर पोलीसांनी जप्त केला आहे.

अवैध 

व्यवसायांवर मोठया प्रमाणात कारवाई करण्याचे आदेशान्वये सहा पोलीस उप अधीक्षक डॉ अर्जुन

भोसले, , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

 यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर कारवाई कऱण्यात आली.

लखन मुकेश अभंगराव रा. सहयाद्री नगर इसबावी, पंढरपुर,  याचे घराचे खोली मध्ये विदेशी बनावटीची फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी

उपलब्ध असलेला दारू साठा आढळुन आला.

हा अवैध मद्य साठा विक्री 

करण्याचे तयारीत तो  असल्याबाबत माहीती मिळाले नंतर 

लखन मुकेश अभंगराव रा. सहयाद्री नगर इसबावी, पंढरपुर,  याचे

घराचे खोली मध्ये जावुन पाहीले असता अमोल करकंबकर रा. जुनी पेठ, पंढरपुर  यांच्या  कडील मद्यसाठा  दिसुन आला.

त्यात ओल्ड बील एक्ट्रा स्पेशल वीस्की कंपनीचे

७५०मीलीचे १०८ प्लॅस्टीकच्या बाटल्या प्रत्येकी किंमत १२५/-रू त्यावर फक्त गोवा

 रॉयल स्टॅग सुपरीर विस्की,  मॅकडॉल नं १ 

 इंम्पेरीअल ब्ल्यु

बेडेड ग्रीन वीस्की,

या मद्याच्या बाटल्या खोक्यात सापडल्या.

 याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले असुन सदरचा माल कोठून आणला व तो पुढे कोणास विक्री करणार आहे याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पंढरपुर शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,.अपर पोलीस अधिक्षक प्रितम कुमार यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक  अशिष कांबळे,  राजेश गोसावी, शरद कदम,  दादासाहेब माने,  सुरज हेंबाडे,  विठ्ठल विभुते,  सिरमा गोडसे,  नितीन पलुसकर, सचिन हॅबाडे, प, प्रसाद औटी, शहाजी मंडले, समाधान माने,  बजरंग बिचुकले,  निलेश कांबळे तसेच राज्य उत्पादन शुल्क सोलापूर ग्रामीण विभागाचे /विजय नवनाथ शेळके यांनी केली आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.