स्वातंत्र्यदिनी निमीत्त डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन रुग्णालयात मोफत बालरोग व कावीळ तपासणी शिबिर संपन्न.


 स्वातंत्र्यदिनानिमित्त*

*पंढरीत डॉ शितल शहा यांच्या* नवजीवन रुग्णालयात कावीळ तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

पंढरपूर प्रतिनिधी 

पंढरपूर येथे भारताच्या 78 व्यास्वातंत्र्यदिनानिमित्त  गुरुवार दि . 15ऑगस्ट रोजी लहान मुलांचे देवदूत अशी ख्याती असलेले डॉ शितल शहा यांच्या नवजीवन बाल रुग्णालयात 

बालरोग व कावीळ तपासणी महा शिबीर उत्साहात संपन्न झाले .सकाळीं 10ते सायंकाळीं 5या वेळेत कऱण्यात आले होते,पंढरपूर येथील 350ते 400 गरजू बालकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला.अशी माहिती डॉ शितल शहा यांनी दिली.

या कार्यक्रमाचे आयोजन आय एम ए, आय ए पी व नवजीवन बाल रुग्णालय यांच्या सहकार्याने कऱण्यात आले  होते.असुन प्रमूख पाहूणे म्हणून तहसीलदार सचिन लंगुटे , डॉ संजय देशमुख,उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ महेश सुडके,

, डॉ शितल शहा , डॉ  रवी आहेर उपस्थित होते.

या बालरोग व कावीळ तपासणी शिबिरात लहान मुलांचे पोटाचे विकार,

या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी आणि योग्य मार्गदर्शन करुन समुपदेशन करण्यात आले.

पुणे येथील सुप्रसिध्द रुबी हॉल हॉस्पिटल मधील डॉ. मनोज श्रीवास्तव, डॉ विष्णू बिरादार, डॉ पवन हंचनाळे, डॉ विनीत शहा, डॉ सिद्धांत चव्हाण, डॉ अमोल जाधव, डॉ मधुर परदासानी, डॉ राम विश्वकर्मा या तज्ञ डॉक्टर्स नी तपासणी केली.

या शिबिरात हिपॅटायटीस बी आणि सी, लिव्हर कार्य तपासणी, फायब्रिओ स्कॅन या तपासण्या करण्यात आल्या. डॉ शहा यांच्या या सेवाभावी व दानशूर वृत्तीने पालक भारावून गेले, अनेक पालकांनी डॉक्टरांच्या रुपात प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग भेटला अशा सद्भावना व्यक्त केल्या.यावेळी डॉ संजय देशमुख, बालरोग तज्ज्ञ डॉ प्रदीप केचे, डॉ सुखदेव कारंडे, डॉ प्रशांत निकम, डॉ सुधीर आसबे, डॉ रविराज भोसले, डॉ अमोल परदेशी,डॉ विनायक उत्पात आदि मान्यवर उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.