पंढरीत भा ज पा च्या वतीने राष्ट्रिय हातमाग दीन, साजरा.
पंढरीत भा ज पा च्या वतीने, राष्ट्रीय हातमाग दिन,साजरा.
प्रतिनिधी पंढरपूर - पंढरपूर येथे बुधवार दी 7ऑगस्ट रोजी भा ज पा महीला आघाडी यांचा वतीने
'राष्ट्रीय हातमाग दिन'
साजरा करण्यात आला.
76वर्षांपुर्वी
आजच्या दिवशी स्वदेशी चळवळीचा शुभारंभ झाला, आणि ७ ऑगस्ट 2015 रोजी हातमाग दिन हा चेन्नई मध्ये घोषित झाला.
आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये हातमाग वस्तू विकत घेण्याची लाट ही निर्माण झाली.
यामध्ये खादी किंवा आपल्या भारतामध्ये तयार होणाऱ्या सर्व वस्तू ह्या घरोघरी पोहोचल्या,
वास्तविक ०७ ऑगस्ट १९४५ हा स्वदेशी चळवळीचा दिवस असल्याने,या माध्यमातून देशाचे पंतप्रधान .नरेंद्र मोदी हे स्वदेशी वस्तूंना आणि त्याचबरोबर आपल्या लोकांच्या कामाला चालना मिळावी आणि ते स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभे राहावेत या साठी ते नेहमीच प्रयत्न करीत असतात.
आज पंढरपूर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी महिला मोर्चा त्याचबरोबर जिल्हा संयोजक या सर्वांच्या वतीने 'हातमाग दिन' साजरा करण्यात आला.
यावेळी पंढरपुरातील सर्वात जुने खादीचे दुकान म्हणजेच 'खादी ग्रामोद्योग' या ठिकाणी जाऊन सर्वांनी खादीचे रुमाल खादीचे शर्टचे कापड, त्याचबरोबर स्वदेशी बनावटीचे गुलकंद अशा अनेक वस्तू विकत घेतल्या.
आणि आज हातमाग दिवस साजरा केला.
या खादी ग्रामोद्योग दुकानचे मालक मोहन आरस यांच्याकडे जाऊन सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खादीचे कपडे त्याचबरोबर इतर हातमागाच्या वस्तू खरेदी केल्या आणि त्यांच्या आनंदात भर घातली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संयोजक
.बादल सिंह ठाकुर , भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ.प्राजक्ता बेणारे,जिल्हा उपाध्यक्ष हातमाग समिती इन्चार्ज सुजाता वगरे,जिल्हा सरचिटणीस व हातमाग को-इन्चार्ज
सरिता मुडे,
जिल्हा उपाध्यक्ष
सौ.जयश्री क्षीरसागर
जिल्हासरचिटणीस सौ.अंजना जाधव,
शक्ती केंद्रप्रमुख पार्थ बेणारे,
तसेच हरिपाठ हॉटेलचे मालक व युवा उद्योजक सुदर्शन निंबाळकर
आणि हातमाग खादी ग्रामोद्योगचे मालक
.मोहन आरस हे सर्वजण उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment