आयशर टेम्पो व कंटेनर अपघातात टेम्पो जळून खाक.


 आढीव जवळ झालेल्या भीषण अपघातात टेम्पो जळून खाक.

प्रतिनिधी पंढरपूर - पंढरपूर कुर्डूवाडी रस्त्यावर आढीव 

गावाजवळ साड्या आणि रेडिमेड कपड्यांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो आणि सिमेंट पाइप वाहून नेणारा कंटेनर यांची टक्कर होउन झालेल्या भीषण अपघातात आयशर टेम्पो जागीच जळून खाक झाला.

हा अपघात बुधवार दि 22मे रोजी पहाटे पाच वाजता झाला.

कंटेनर क्र एम एच 10टी टी 4746 आणि आयशर टेम्पो क्र एम एच 45, ए ई 5015 यांच्यात समोरासमोर धडक होउन अपघात झाला.

प्रचंड मोठा आवाज आल्याने ग्रामस्थ जागे झाले, तोपर्यंत टेम्पो पेटला होता, यात एकुण 70लाख रूपयांचा माल नष्ट झाला.

दोन्ही वाहनांची धडक झाल्यावर कंटेनर च्या डिझेल टाकी पेटल्याने आयशर जळून गेला.

गुजराथ मधील अहमदाबाद येथून साड्या व रेडिमेड कपडे घेऊन कर्नाटक मधील चडचण येथे टेम्पो चालला होता. अपघातात टेम्पो चा क्लिनर जखमी झाला आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी पंढरपूर येथील नगरपालिकेचा अग्निशामक बंब मागविण्यात आला होता,

या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती.

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार स्वप्नील वादडेकर आधिक तपास करीत आहेत.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.