कासेगाव येथे बारा लाख रुपयांची चोरी.


 कासेगाव येथे चोरी, अज्ञात चोरट्याने बारा लाख रुपयांचा ऐवज केला लंपास.

प्रतिनिधी पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील बेंद वस्ती येथे राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात शुक्रवार दि17रोजी मध्यरात्री चोरी होऊन रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण बारा लाख रुपयांच्या मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.

तीव्र उकाड्यामुळे घराचे दरवाजे उघडे ठेवून झोपणे महागात पडले,

याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी इब्राहिम शेख वय 40 हे कासेगाव येथील बेंद वस्ती येथे वस्तीवर कुटुंबासोबत राहतात,शेती आणि ईतर व्यवसाय करुन शेख कुटुंबाची गुजराण करतात.

तीव्र आणि कडक उन्हाळ्यामुळे शुक्रवारी रात्री ते घराचे दरवाजे उघडे ठेवून झोपले होते, या संधीचा गैर फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने डाव साधला आणि शेख यांनी मोठ्या कष्टाने जमविलेली रोख रक्कम चार लाख रुपये आणि सोन्याचे दागिने पळवून नेले.

सोन्याचे गंठण,कानातील वेल,गळसर, सोन्याच्या रींगा,एक तोळे वजनाचे चार सोन्याच्या अंगठ्या असा एकूण बारा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

याबाबत फिर्यादी इब्राहिम शेख यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सपोनि विश्र्वास पाटील आधिक तपास करीत आहेत.

पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून  ग्रामस्थांमध्यें भयाचे वातावरणच निर्माण झाले आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीदिवशी भोसे पाटी येथील मंगल कार्यालय मालकाच्या घरी भर दुपारी चोरी झाली तर कोर्टी येथेही भाजीपाला, दूध विक्री करणाऱ्या महिलेच्या घरात चोरी झाली.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.