मंगळवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुक मतदानासाठी प्रशासन सज्ज.- सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन इथापे.


 मंगळवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज. सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा 

प्रांताधिकरी सचिन इथापे.

 पंढरपूर  प्रतिनिधी-

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत जिल्ह्यात ४२ सोलापूर लोकसभा मतदार संघातील २५२ पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून, मतदान मंगळवार दि ७ मे २०२४ रोजी होणार आहे. मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

अशी माहिती प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन इथापे यांनी प्रांत कार्यालय येथील सांस्कृतिक भवन येथे रविवार दि.5 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता 

झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

२५२-पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण पुरुष मतदार १८४६२४ स्त्री मतदार १७३१९१ व इतर मतदार २३ असे एकूण ३५७८३८ एवढे मतदार व ५४९ सैनिक मतदार आहेत. मतदार संघाचा EP ratio दि १९एप्रिल रोजी ७८.८१ एवढा आहे. Gender Ratio हा ९३७ आहे. मतदारसंघामध्ये १८-१९ वयोगटातील एकूण मतदार ६९९७ असून २०-२९ वयोगटातील मतदार हे ७५६९९ इतके आहेत. ८५ वर्षावरील मतदारांची संख्या हि ५३५४ असून PWD मतदार संख्या हि २५८७ इतकी आहे.

२५२- पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण मुळ मतदान केंद्र ३३७ (शहरी १०८ व ग्रामीण २२९) व अशी एकूण 337 मतदान केंद्रे आहेत. तसेच ३३७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. मतदार संघामध्ये १ (केंद्र क्र ७२- गौतम विदद्यालय, पंढरपूर) मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. तसेच ५०% प्रमाणे १७३ मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

मतदान केंद्रावर सुविधाः मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेता मतदारांना मंडप व्यवस्था, बैठक व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांना व्हील चेअर, मतदान केंद्रात रॅम्प, ओआरएस पाकिटे, वैद्यकीय सुविधा, हिरकणी कक्ष, प्रथमोपचार पेटी, मदत कक्ष, स्वतंत्र प्रसाधनगृह, पुरेशी प्रकाश व्यवस्था आदी बाबी उपलब्ध राहणार आहेत. मतदारांना आपले मतदानाचे केंद्र, मतदार यादीतील क्रमांक आदि माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी बीएलओ मार्फत घरोघरी मतदार चिठ्ठ्या वाटप केल्या आहेत. तसेच एकाच ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी मदतीसाठी स्वयंसेवक असणार आहेत.

विशेष मतदान केंद्रः आदर्श मतदान केंद्रातंर्गत महिला व्यवस्थापित दोन मतदान केंद्र, दिव्यांग व्यवस्थापित एक मतदान केंद्र आणि युवा कर्मचारी व्यवस्थापित दोन मतदान केंद्र ही मतदान केंद्र विशेष राहणार आहेत.

महिला कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र मतदान केंद्र क्र. १०२- पंढरपूर- द.ह. कवठेकर प्रशाला, पश्चिम बाजूची खोली क्र.१ व मतदान केंद्र क्र. १८३-मंगळवेढा-न्यु इग्लिश स्कूल, मंगळवेढा पश्चिम बाजूची खोली नं.१४ (नवीन इमारत) येथे महिला कर्मचा-यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. येथील मतदान केंद्रांत संपूर्ण व्यवस्थापन महिलांचे राहणार आहे.

दिव्यांग कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र मतदान केंद्र २५७-गोणेवाडी-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोणेवाडी, जवाहर योजना इमारत खॉली नं.१ येथे दिव्यांग कर्मचा-यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. येथील मतदान केंद्रांत संपूर्ण व्यवस्थापन दिव्यांग कर्मचा-यांचे राहणार आहे.

 युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र: मतदान केंद्र क्र.१६०- तरटगांव कासेगाव - जिल्हा परिषद प्राथमिक

शाळा, पूर्व बाजूची खोली क्र. २. तरटगांव (कासेगांव) व मतदान केंद्र क्र. २७२-लमाणतांडा -माध्यमिक आश्रम शाळा लमाणतांडा जिण्याच्या डाव्याबाजुने खोली नंबर १ येथे युवा कर्मचा-यांच्या वतीने चालविण्यात येणारे मतदान केंद्र राहणार आहे. येथे युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र राहणार आहे.

गृह मतदान - भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मतदारसंघामध्ये एकुण ५३३ दिव्यांग व ८५ वर्षापुढील मतदार असून त्यापैकी पैकी ५०२ मतदारांनी आपल्या मतदानांचा हक्क बजावला. गृह मतदानाचा हक्क बजावला

मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी एका मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष एक, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष एक, मतदान अधिकारी क्रमांक एक, मतदान अधिकारी क्रमांक दोन, शिपाई, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, बी एल ओ, आणि पोलीस शिपाई 2 असे किमान 10 असे एकूण ३७१० अधिकारी कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

वाहतुक व्यवस्थाः- मतदान केंद्रावर मतदान साहित्य व कर्मचारी यांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी ४८ बसेस व ०९ जीप यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कडक उन्हाळ्यामुळे मतदारांनी सकाळ च्या वेळेत जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

मतदारांना केंद्रावर विविध प्रकारची मदत करण्यासाठी एन सी सी तसेच एन एस एस विद्यार्थ्यांची सहकार्य घेण्यात येत आहे.

200मीटर मध्यें मतदारांव्यातिरिक्त कुणालाही प्रवेश असणार नाही, या क्षेत्रात मोबाईल फोन तसेच शूटिंग करण्यास बंदी घालण्यात आली असुन सर्व केंद्रांवर मायक्रो ऑबझर्वर चें लक्ष असणार आहे.अशी माहिती देण्यात आली.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.