काणे ज् सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रथम वर्धापन दीन उत्साहात संपन्न.
डॉ. काणेज गायञी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न .
पंढरपूर प्रतिनिधी--पंढरपूर येथील सुप्रसिद्ध डॉ. का णेज हाँस्पीटल चा वर्धापनदिन साजरा करत असतानाच डॉ. काणे दाम्पत्याने त्यांच्या नवीन हाँस्पीटल मध्ये समाजातील सर्व रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि सवलतीत उपचार केले. ह्या शिबिराचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला
डॉ. वर्षा काणे यानी हाँस्पीटल व शिबीराबद्दल माहिती देताना असे सागितले की गेल्या वर्षी ह्या हाँस्पीटल चे मोठ्या थाटात उदघाटन झाले . त्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही असंख्य रुग्णावर उपचार करून नीट केले त्या बद्दल आम्ही व आमचे सर्व कर्मचारी समाधानी आहोत आणि ह्यापुढे ही असेच काम करणार आहे असा विश्वास बोलून दाखवला.
.दि.२४ एप्रिल ते २ मे दरम्यान डॉ.काणेज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधे वर्धापनदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णांची मोफत तपासणी,ब्लड प्रेशर,ब्लडशुगर, हिमोग्लोबीन आणि हाडातील कॅल्शियम चेक अप पूर्ण मोफत करण्यात आली. सोनोग्राफी ५००/- रू, 2D Echo 750/- रू. ईसीजी,एक्स रे ,सी टी.स्कॅन ,इ पी स्टडी ,रक्त तपासणी,कॅन्सर लस पासून टेस्ट ट्युब बेबी पर्यंत सगळ्यांवरच भरपूर सवलत देण्यात आली होती.या शिबिराचा लाभ पंढरपूर व आसपास च्या भागातील गरजू रुग्णांनी घेतला.
दिनांक २७ एप्रिल रोजी जीम आणि व्यायाम शाळा तील लोकांसाठी सीपीआर प्रशिक्षण, " जीवन संजीवनी" देण्यात आले.अचानक आपल्यासमोरच एखाद्याला,छातीत दुखू लागले,धाप लागली,चक्कर आली ,ह्रदय ,श्वास बंद पडले तर आपण काय करायला पाहीजे ह्याचे मॅनीकवीन च्या सहाय्याने प्रशिक्षण दिले. ह्या कार्यक्रमाचे उदघाटन फिटनेस क्वीन वर्षा उसगावकर च्या हस्ते झाले. ह्या प्रशिक्षणास उत्तम प्रतिसाद मिळाला.
दिनांक २८ एप्रिल रोजी गर्भाशय मुखाचा कॅन्सर ची तपासणी शिबीर घेण्यात आले. सोलापूरचे सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल ,भारत विकास परिषद, पंढरपूर, काणे मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.साधारणत: रू २०००/- खर्चाची ही तपासणी मोफत ठेवण्यात आली होती.कॅन्सर होण्यापूर्वीच प्रि कॅन्सरस स्टेजमधे निदान व उपचार होऊ शकतात ,ही तपासणी ,चाळीशी नंतर प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा तरी करून घेणे गरजेचे व हितावह आहे, असे प्रतिपादन या हॉस्पिटल चे प्रमुख ,प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ ,डॉक्टर सुरेंद्र काणे यांनी केले.
या सर्व वाढदिवस सोहळ्याची सांगता ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर यांच्या, "आरोग्य आणि अध्यात्म" या विषयावरील अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यानाने झाली. डॉक्टर,शिक्षक आणि सच्चा समाजसेवक यांना वेगळे अध्यात्म करण्याची गरज नाही. आरोग्य आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त असेल तरच आरोग्य उत्तम राहील. मनातील कचरा काढला की, मन निरोगी राहते. मनातील कचरा कसा काढायचा हे अध्यात्म शिकवते.
जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अध्यात्म आहे. दुसऱ्याचे दु:ख, पीडा समजून घेणे आणि त्याचे हरण होण्यासाठीच आपण आपले आयुष्य वेचणे, हा धागा आरोग्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात आणि अध्यात्मात समान आहे. असे विचार ऐकवून त्यांनी श्रोत्यांना तास दीड तास मंत्रमुग्ध केले. डॉक्टर काणे कुटुंबीयांची पंढरपूर करांच्या वैद्यकीय सेवेची सत्त्याऐंशी वर्षांची गौरवशाली परंपरा, आधुनिक तंत्रज्ञान आणि अद्यावत सोयी सुविधा युक्त सुसज्ज नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बद्दल त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शुभाशीर्वाद दिले.
हे सर्व वाढदिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टीम डॉक्टर काणेज गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ने अथक परिश्रम घेतले...
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment