स्वेरीतील इले्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप.


 स्वेरीतील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप

पंढरपूर-प्रतिनिधी गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. त्यानिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीमध्ये चार वर्षे परिश्रम केल्यामुळे आणि गुरु-शिष्याचे एक वेगळे बंधन जपल्यामुळे कॉलेज सोडताना विद्यार्थी  भावनिक झाले होते. 

      स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली हा समारंभ संपन्न झाला. दीप प्रज्वलनानंतर विभागप्रमुख डॉ.पवार यांनी विद्यार्थ्यांना करिअरसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना आपल्या पुढील जबाबदारीची जाणीव करून यशाचे कानमंत्रही दिले. त्यानंतर काही करमणूक प्रदान कार्यक्रम करण्यात आले. स्वेरीमध्ये पदवीचे चार वर्ष शिक्षण घेतल्यानंतर समारोप प्रसंगी विद्यार्थी भावनिक झाले होते. या समारंभाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी चार वर्षातील आपले अनुभव सादर केले. यामध्ये ऋतुराज तारापूरकर, रोहित मिसाळ, सुयश गायकवाड, शिवराज मगर, वृषाली जानगवळी यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी चार वर्षांच्या काळात संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक वर्गांनी आमच्याकडून अभ्यास कसा करवून घेतला? परिश्रमाद्वारे अभ्यासात सातत्य ठेवण्याबाबत तसेच प्राध्यापकांनी आम्हाला चुकीच्या वेळी दिलेली शिक्षा, त्यातून मिळालेले अनमोल शिक्षण यातून आमच्या करिअरसाठी तयार झालेली परिपक्व आणि संस्कारित प्रतिमा या विषयी विद्यार्थ्यांनी अतिशय हृदयस्पर्शी असे अनुभव सांगितले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रा.एम.ए.सोनटक्के यांनी समन्वयकांची भूमिका बजावली. प्रा.एस. वाय. अभंगराव व प्रा.एम.ए. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.एन. पी. कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.