श्री माताजी निर्मला देवी विद्या प्रशालेत स्वसंरक्षण प्रशिक्षण.
श्री माताजी निर्मलादेवी प्राथ. उच्च प्राथमिक विद्या मंदिर, येथे स्व संरक्षण प्रशिक्षण.
पंढरपूर(प्रतिनिधी )_
पंढरपूर येथील योद्धा गुरुकुल फाउंडेशन तर्फे श्री योगेश भोसले व पृथ्वीजीत कांबळे यांनी श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक विद्या मंदिर येथे मुलांना व मुलींना स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले."आज सर्वांना आपल्या स्वतःच्या संरक्षणाची गरज आहे. जीवनात कॊणताही वाईट प्रसंग आला तरी धाडसाने सामोरे जाऊन लढणे गरजेचे आहे. माणसाचं मन आणि मनगट बलशाली असल्यास कोणत्याही प्रसंगाचा सामना करू शकतो असे" योगेश भोसले म्हणाले.आजच्या सरावात इ.१ली ते ७ वी विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले आणि सराव मध्ये ७ वी वर्गातील मुलींनी भाग घेतला. मुख्याध्यापक संतोष कवडे म्हणाले " आज आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा मित्रांसोबत शाळेत किंवा खेळात करू नका. गरज असल्यावर कठीण प्रसंगी याचा वापर करावा." हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोसले सर,मुजावर सर, आगावणे सर, टापरे सर, सौ. खडतरे मॅडम, सौ. गावडे मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार महेश भोसले सर यांनी मानले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment