भा ज पा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांच्या सतर्कतेने गुमास्ता सोसायटी मधील रहिवासी भयमुक्त.


 एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व,

विशेष पोलीस महानिरीक्षक  सुनिल फुलारी यांची तत्परता, पोलीसांनी दाखविली कार्यक्षमता.

 पंढरपूर (प्रतिनिधी)_

पंढरपूर येथील जुना कासेगाव रस्त्यावरील गुमास्ता सहकारी गृह निर्माण संस्थेत दरोडोखोर शिरत असल्याने येथील रहिवासी रोजच दहशतीच्या सावटाखाली जगत होते,

गेल्या दोन दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता, हे चोरटे झाडीत लपून बसत, आणि संधीची वाट बघत असायचे.

मात्र याबाबत भा ज पा महिला आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ प्राजक्ता बेणारे यांना या सोसायटीत होणाऱ्या चोऱ्यांची तसेच रहिवाश्यांच्या  हतबलतेची 

माहिती मिळताच त्यांनी त्वरित  त्यांनी स्थानिक पोलिसांना ही माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून डॉ प्राजक्ता बेणारे यांनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक  सुनिल फुलारी कोल्हापूर महापरिक्षेत्र यांनाच फोन केला, व याबाबत सविस्तर माहिती देऊन गांभीर्य स्पष्ट केले,

यानंतर त्वरीत हालचाली होऊन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी गुमास्ता सहकारी सोसायटी गाठली, आणि झाडीत लपून बसलेले चोर पोलिसांना पाहताच पाचावर धारण बसुन पळून गेले, या दरोडेखोरांच्या त्रासाला कंटाळून येथील रहिवासी चक्क स्वतः च्या घरावर टेरेस वर लपून बसत, पहाटे पर्यन्त चोर धुडगुस घालून गेल्यावर रहिवासी खाली येत असत,

अखेर रोजच्या या त्रासाला कंटाळून एका महिलेने ही बाब भा ज पा जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांना कळविली ,आणि एका रात्रीत ही वसाहत भयमुक्त झाली, पोलीस निरिक्षक मुजावर यांनी त्वरीत घटनास्थळी जाऊन नागरीकांना न घाबरता परिस्थितीचा सामना कसा करायचा याचे प्रात्यक्षिक दीले, पोलिसांच्या कडे पेट्रोलिंग (गस्त) घालण्यासाठी वाहने कमी पडत असल्याने गरज असूनही पेट्रोलिंग करता येत नाही,

रात्री ७नंतर नवरा बायको जर गाडीवरून चालले असतील तर अडवणूक करुन महिलेचे दागिने, पैसै लुटल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत, वाटमारी करून मारहाण होत असल्याने सायंकाळीं या रस्त्यावर जायचे धाडस कोणि करीत नाही

 मात्र सुनिल फुलारी साहेबांच्या एकच कॉल वर प्रॉब्लेम सॉ ल्व झाला असून ग्रामीण पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तीन घरात व्हिजिटिंग बुक ठेवले असून दररोज गस्त चालू केली आहे.

गृहखात्याची प्रतिमा उंचावली._

 महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वामुळे गृह खात्याची प्रतिमा ही चांगलीच उंचावलेली आहे देवा भाऊंच्या सक्षमतेमुळे आज महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीस सुरक्षित आहेत पण तरीसुद्धा अनेक वेळा महिला व सर्वसामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून उशिरा न्याय मिळतो ही एक खंत वाटते पण तरीसुद्धा पोलीस प्रशासनाच्या बाबतीत देवा भाऊंनी जे अमुलाग्र बदल घडवले त्याच्या माध्यमातूनच ह्या न्यायदान प्रक्रियेला सुरुवात झाली हेच कालच्या उदाहरणावरून स्पष्ट होते अशाच पद्धतीचं काम हे महाराष्ट्रात राहणार आहे आणि त्यातून तात्काळ महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना न्यायची अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून आहे.

डॉ प्राजक्ता बेणारे.

जिल्हाध्यक्षा,भा ज पा .

महीला आघाडी मोर्चा.

पंढरपूर.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.