लाइफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये गुडघा आणि खुब्याच्या रोबोटिक सर्जरी यशस्वी.


 पंढरपूर येथील लाइफ लाइन हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक सर्जरी, गुडघा आणि खुब्याच्या रोबोटिक सर्जरी यशस्वी.

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील नामवंत आणि सर्व सुविधानी सज्ज अशा लाइफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये गुडघा आणि खुब्याच्या रोबोटिक सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या असून याबाबत निष्णात सर्जन डॉ शुभम शिंदे यांनी अधिक माहिती दिली, ते म्हणाले पंढरपूर येथील लाइफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून खुबा आणि गुडघ्याच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आतापर्यंत एकूण १००शस्त्रक्रिया झाल्या असून आता निमशहरी व ग्रामीण भागात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित रोबोटिक सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया लाइफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सुरू करण्यात आली आहे. गेल्या १०दिवसांत १५रोबोटिक सर्जरी करण्यात आल्या असून रोबोट हा सहाय्यक असतो, यामध्ये अचूकता जास्त असते आणि रक्तस्राव कमी होतो, केवळ तीन दिवसांत रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी जातो, असे फायदे असून ६०ते ६५ वय असलेल्या रुग्णांना ही शस्त्रक्रिया करावीच लागते.

यावेळी लाइफ लाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ संजय देशमुख यांनी सांगितले, नेहमीच आपण वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, तंत्रद्यान आपल्या हॉस्पीटल मध्ये आणत असतो शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

रोबोटिक सर्जरी मध्ये मानवी चुका होत नाहीत व रुग्ण लवकर बरा होतो.

वाढत्या वयात गुडघे आणि खुब्याच्या तक्रारीत वाढ होत असते त्यामुळे या शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असते, पंढरपूर सारख्या निमशहरी भागात हे तंत्रज्ञान उपलब्ध असून शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ संजय देशमुख यांनी केले आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.