नूतन नगरसेवक अक्षय गंगेकर यांचा हभप तारे महाराज यांच्या हस्ते सत्कार गंगेकर कुटुंबीयांचे ऋण व्यक्त करीत दिला आशीर्वाद.,


 *नूतन नगरसेवक अक्षय गंगेकर यांचा वारकरी संप्रदायातील महाराज यांच्या हस्ते सत्कार,*

*गंगेकर कुटुंबीयांचे ऋण व्यक्त करीत दिला आशीर्वाद.*


पंढरपूर अनिल नगर येथे समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने नूतन आणि धडाडीचे नगरसेवक अक्षय गंगेकर यांचा वारकरी संप्रदाय तील थोर परमपूज्य तारे महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अक्षय गंगेकर हे आपल्या प्रभागातील सर्व घटकांना समान न्याय देत असतात,

अनिल नगर भागात अनेक वारकरी संप्रदायाचे विविध मठ, मंदिरे असून या महाराज मंडळींना नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या सहकार्यामुळे कधीच कोणतीही अडचण आली नाही,

ज्येष्ठ तारे महाराज यांनी गंगेकर यांच्या सत्कार प्रसंगी प्रवचन करून त्यांच्या कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, ते म्हणाले, गेली ३०ते ३५वर्षांपासून हे कुटूंब जनतेची अविरत सेवा करीत असून निस्वार्थी, विनम्र भाव असल्याने त्यांच्या कुटुंबाला कधीही, काहीही कमी पडत नाही,

आम्हा वारकरी संप्रदायामधील मंडळींना ते नेहमीच मदत करत असतात,

आम्ही आमचे भाग्य समजतो की आज ते आमच्या सोबत आहेत, मेंबर साहेब कीर्तन, प्रवचन असले की येतात. त्यांची साथ असल्याने चिंता नाही, ते न पा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आले आहेत.त्यांचे पाठबळ असल्याने आम्ही निश्चिंत असतो,

यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन नगरसेवक अक्षय गंगेकर म्हणाले वारकरी संप्रदायाचे मनापासून धन्यवाद गेले ३५ ते ४० वर्षा पासुन हा वारकरी संप्रदाय आमचे वडील लोकप्रिय नगरसेवक श्री प्रताप आण्णा गंगेकर व पंढरपूरच्या प्रथम महिला माजी नगराध्यक्षा व नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर व गंगेकर कुटुंबाच्या पाठिशी खंबीर पणे उभा राहीला आहे.

मी या ठिकाणी महाराजांचे ऋण व्यक्त करतो, तुमचे शासन दरबारी कोणतेही काम असो, अडीअडचण किंवा न पा प्रशासनच कसलही काम असो विना संकोच सांगा, आम्ही समस्या सोडवू,वारकरी संप्रदायाचे व गंगेकर कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध पुर्वी पासुन आहेत आज त्याचं हे प्रेम बघून मला खुप आनंद झाला आणी कळालं की लोकप्रिय नगरसेवक श्री प्रताप आण्णा गंगेकर माजी नगराध्यक्ष व नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर यांनी यांच्या आयुष्या मध्ये हे सोन्या सारखी माणसे कमविले या गोष्ठी चा खुप अभिमान व आनंद वाटतो अशीच सेवा माझ्या हातुन ही घडावी हिच श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना करतो .

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.