विश्व मानव रूहानी केंद्र यांच्या वतीने आषाढी वारी निमित्त मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन.
विश्व मानव रूहानी केंद्र यांच्या वतीने पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्त मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन.
पंढरपूर (प्रतिनिधी)विश्व मानव रुहानी केंद्र यांच्या वतीने भारताची दक्षिण काशी पंढरपूर येथे भक्तीमार्ग परिसरातील भगवान मनमाडकर यांच्या जागेतआषाढी यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पंढरपूर येथील नगराध्यक्षा डॉ प्रणिता भालके यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सत्यविजय मोहोळकर,
नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, शिबिराचे मार्गदर्शक,संयोजक ॲड अखिलेश वेळापुरे, समाजसेवक भगवान मनमाडकर, राजेंद्र आचलारे, दैनिक तरुण भारत संवाद चे पत्रकार चैतन्य उत्पात, ज्येष्ठ समाजसेवक अभय झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात सर्दी पासून ते अगदी हृदयविकाराच्या आजारावर उपचार करण्यात येत असून औषध, गोळ्या मोफत देण्यात येत असल्याचे संयोजकांनी सांगितले,
प्रमुख पाहुण्या डॉ प्रणिता भालके यांनी या कार्याचे कौतुक करत भक्त पुंडलिक यांच्या सेवेची उपमा दिली ,
नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांनी पुढच्या वर्षी महाद्वार येथील होळकर वाडा हे ठिकाण आरोग्य शिबिरासाठी देऊ केले सांगितले,
सत्यविजय मोहोळकर यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला,
पहिल्याच दिवशी शंभर रुग्णांची तपासणी करून औषधे व गोळ्या देण्यात आल्या,
ही एक नोंदणीकृत धर्मादाय संस्था आहे, जी २००५ पासून मानवतेची सेवा करत आहे. विश्व मानव रुहानी केंद्र हे संस्था नोंदणी कायदा १८६०, हरियाणा संस्था नोंदणी आणि नियमन कायदा २०१२ अंतर्गत नोंदणीकृत असून, एक धर्मादाय संस्था म्हणून आयकर कायदा १९६१ अंतर्गत करमुक्त आहे. आयकर कायद्याच्या अनुपालनानुसार संस्थेच्या आर्थिक हिशेबांचे दरवर्षी लेखापरीक्षण केले जाते.
आम्ही २००८ पासून गृह मंत्रालयाकडे परकीय योगदान नियमन कायद्यांतर्गत (FCRA) देखील नोंदणीकृत आहोत. आम्ही FCRA च्या सर्व आवश्यकता आणि नियमांचे पालन करतो.
२००८ पासून, आम्ही FCRA च्या सर्व आवश्यकता आणि नियमांचे पालन करतो.
विश्व मानव रुहानी केंद्राची संपूर्ण भारतात सुमारे २७२ केंद्रे आहेत.
आम्ही धर्मादाय तत्त्वावर काम करतो आणि वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र यांना सेवा देणारे तसेच विद्यार्थी, अनाथ, आजारी आणि वृद्धांना आधार देणारे धर्मादाय सामाजिक सेवा कार्यक्रम हाती घेतो. श्री. अमरनाथ, मणी महेश, श्रीखंड महादेव, आदी कैलास, किन्नौर कैलाश येथे मोफत मेडिकल कॅम्प व मोफत अन्नदान शिबिर राबवण्यात येतात.
आपल्या महाराष्ट्रात श्री. सप्तशृंगी देवी सप्तशृंगी गड येथे मोफत वैद्यकीय शिबिर व अन्नदान तसेच मागील वर्षापासून वारकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजन, शैक्षणिक साहित्य वाटप.
*महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मोफत वैद्यकीय शिबिर संत बलजीत सिंह, स्पिरिच्युअल हेड ऑफ विश्व मानव रुहानी केंद्र. यांच्यामार्फत वरील सर्व कार्यक्रम राबवण्यात येतात.*
*या अनुषंगाने विश्व मानव मानव रुहानी केंद्र, नवानगर, लाईट हाऊस सेंटर पिंपळनेर यांच्यामार्फत आषाढी वारीमध्ये येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना आव्हान करण्यात येते की, दि . २२ जुलै ते २६ जुलै २०२६आपण गजानन महाराज भक्त निवासासमोर मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment