तुकाराम मुंढे यांचा सिया गोयल च्या वडिलाना दणका, पुणे मार्केट यार्ड येथील दुकान सील.,


 🟦⭕ *तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका, पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील*                                                                      


       पुणे : पुण्याच्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने मोठी कारवाई केली आहे. सिया गोयल ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे ती चर्चेत आली. तिचं पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल याच्याशी लग्न ठरलं होतं. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण सियाचं चेतन चौधरी या तरुणासोबत प्रेम प्रकरण होतं. सिया आणि चेतन या दोघांनी केतनला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून देत त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांना आता मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.  

         अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात मोहीम राबवली जात आहे. या मोहीमच्या माध्यमातून दुषित अन्नपदार्थ आणि खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर छापा टाकला. यावेळी आठ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.        ◼️ *पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस* 

सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मसाल्याचं दुकान आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने या दुकानात धाड टाकली. यावेळी तपासणी केल्यानंतर हळद पावडर, तीळ, सोयाबीनचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. 8 लाख रुपयांचा 4 हजार किलोंचा साठा जप्त करण्यात आला आहे. लेबलमधील त्रुटी, भेसळीच्या संशयावरुन हा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित दुकानाने आवश्यत नियम आणि तरतुदींचे पालन न केल्याने पुढील आदेशापर्यंत थेट व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.                                   ◼️ *निकृष्ठ दर्जाचा ठपका* 

सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात बी. जी. गोयल अॅण्ड कंपनी नावाचे दुकान आहे. या दुकानावर एफडीएने मंगळवारी अचानक धाड टाकली आणि तपासणी केली. यावेळी दुकानातील माल निकृष्ठ दर्जाचा असल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि चार हजार किलोंचा साठा असा एकूण 8 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. एफडीएने सिया गोयलच्या वकिलांचे दुकानाच सील केलं आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.