आषाढी यात्रेत आ. रोहित पवार यांनी वाटल्या एक लाख छत्र्या.


 आषाढी यात्रेत आ. रोहित पवार यांनी केले एक लाख छत्रीचे वाटत 

यात्रेतील गरजवंतांना छत्रीचे वाटप करून केली सेवा

पंढरपूर/ प्रतिनिधी:- 

गेल्या पंधरा दिवसापासून देहू आळंदी येथून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीकडे मार्गस्थ झालेल्या दिंड्या मजल दरमजल करत पंढरपुरात देवशयनी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी दाखल झाल्या. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या वारकरी भाविकांना जामखेड कर्जत चे आमदार रोहित पवार यांनी सुमारे एक लाख छत्रींचे वाटप करून वारकऱ्यांची सेवा केली. 

पंढरपूर शहराच्या विविध भागांमध्ये वारकरी भाविकांसोबतच महिला पोलीस, छोटे व्यावसायिक, तृतीयपंथी, अपंग व्यक्ती, आरोग्य सेवक, परिचारिका तसेच होमगार्ड व पोलीस यांना या छत्रांचे वाटप करून त्यांना रस्त्यावर उभा राहून काम करताना येणाऱ्या अडचणी पासून दिलासा मिळाला तसेच व्यापार्यांनाही यात्रेतील अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला.

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना पावसाचे आगमन झाल्यास भाविक वारकऱ्यांचे व्यापाऱ्यांची उन्हापासून संरक्षण व्हावे तसेच पावसापासून संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने छत्र्यांचे वाटप केल्यामुळे ठिकठिकाणी कामावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची धावपळ होऊ नये या उद्देशाने या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून आषाढी वारीच्या निमित्ताने सेवाभाव म्हणून छत्र्यांचं वाटप करण्यात आले. यासाठी डॉ. योगेश रणदिवे, शहराध्यक्ष दीपकदादा वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर सर, आसिफ पटेल, दिनेश म्हमाने यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी या छत्र्या वाटप करण्याचे नियोजन केले होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.