डॉ प्राजक्ता बेणारे यांची भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिवपदी निवड.
डॉ प्राजक्ता बेणारे यांची भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिवपदी निवड,
जनमानसातून शुभेच्छांचा वर्षाव
पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ प्राजक्ता बेणारे यांची महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे.
महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार सौ चित्रा वाघ यांनी नुकतेच डॉ प्राजक्ता बेणारे यांना निवडीचे पत्र दिले आहे.
डॉ प्राजक्ता बेणारे यांनी २०१८पासून सक्रिय राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, सुरुवातीला पंढरपूर शहर उपाध्यक्षा या पदावर त्यांची नियुक्ती तत्कालीन भाजप शहराध्यक्ष कै. संजय वाईकर यांनी त्यांना संधी दिली,
महिला सक्षमीकरण, एकीकरण, करण्यासाठी त्यांनी शहरात मोठे प्रयत्न केले, अनेक महिला, मुली यांच्यावरील अन्यायाचे निवारण करून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, यामुळे अल्पावधीतच जनमानसात त्यांची प्रतिमा उंचावली,
गोरगरीब जनता, छोटे विक्रेते, असहाय महिला यांना सर्वतोपरी सहकार्य करून अशा वंचीत आणि शोषीत वर्गाला न्याय मिळवून दिला, भाजपा या सत्ताधारी पक्षाच्या विविध लोक कल्याणकारी योजना महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत पोचवून सक्षमतेने राबविल्या,
शहरातील अनेक निराधार, परीतक्त्या,एकाकी महिला, वृद्ध स्त्रिया यांच्या न्याय हक्कासाठी
संघर्ष केला, गरज असेल तेव्हा पोलिसापर्यन्त जाऊन न्यायाची परखड भूमिका घेऊन गुंडगिरी, किंवा राजकीय दबावाला बळी न पडता सत्याची कास धरून वंचीत घटकास न्याय मिळवून दिला.
त्यांच्या निर्भीड,बेदरकार,धाडसी, करारी नेतृत्वाची दखल घेऊन हाय कमांड ने योग्य दखल घेऊन डॉ प्राजक्ता बेणारे यांना पदोन्नती बहाल करून जनतेची सेवा करण्याची संधी दिली.
सोशल मीडियावर त्यांची
त्यांना नवीन जबाबदारी, पद देण्यात असल्याची माहिती व्हायरल होताच विविध स्तरातून सकारात्मक प्रतिक्रिया, आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment