पंढरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, नऊ लाख ३०हजार रुपयाचे सोने जप्त.
पंढरपुर शहर पोलीस ठाणे, "गुन्हे प्रकटीकरण शाखेची" धडाकेबाज कामगीरी सोन्याचे दागीने चोरणाऱ्या आरोपी कडुन ९, लाख तीस हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.
आषाढी वारीच्या तोंडावर गुन्हेगार जेरबंद.
पंढरपूर _(प्रतिनिधी)
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणुन तीन आरोपीतांना अटक करून गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली. अतुल कुलकर्णी., पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, विजयकुमार कबाडे अप्पर पोलीस
अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये प्रशांत डगळे, सहा पोलीस उपअधिक्षक पंढरपुर विभाग पंढरपुर व टी वाय मुजावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर दाखल गुन्हयातील फिर्यादी शोभा आबासाहेब निलंगे, रा. शिक्षक कॉलनी, माळशिरस जिल्हा सोलापूर. हे दिनांक रोजी १७एप्रिल रोजी दुपारी १२:३० वा चे सुमारास माळशिरस ते पंढरपूर बसने प्रवास करत असताना २८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असा- तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे चालू भावाप्रमाणे पंढरपूर बस स्थानक येथून अज्ञात चोरट्याने चोरी केलेले होते.
त्यानंतर सदर गुन्हयाचा तपास चालू असता सदर गुन्हयाचे तपासकामी पथके तयार करून पंढरपूर शहरातील ३६ ते ४० सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हयात दोन आरोपी प्रिया रवींद्र काळे वय ३० वर्ष, रा राजापूर ता. मंगळवेढा जिल्हा सोलापूर,
संदीप युवराज मोरे वय २६ वर्ष, रा. अंबाबाई मंदिर गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन, विजापूर रोड सोलापूर यांचेकडून सदर गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे मुकुंद संजय चव्हाण रा सुस्ते ता.पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचे दिनांक ३मे रोजी १२:३० वा वाजताचे सुमारास त्यांचा मावस भाऊ वैभव जाधव यांचे श्रीराम मंगल कार्यालय इस बावी पंढरपूर येथे लग्न समारंभात गर्दीचा फायदा घेऊन नवरी मुलीचे फिर्यादीचे आईकडे ठेवलेले बॅग मधील २०.७८९ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५.९३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, ९.८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोकर्स असे एकूण ३६.४९९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत ५लाख४०हजार- रुपये चालू भावाप्रमाणे अज्ञात चोरट्याने चोरी केले होते.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पंढरपूर शहर व इतर गाव व शहरातील जवळपास ६५ ते ७० सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून तसेच सी डी आर एस डी आर व मोबाईल टॉवर चे तांत्रिक विश्लेषण करून संदीप युवराज मोरे वय २६ वर्ष, रा अंबाबाई मंदिर गरीबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन विजापूर रोड सोलापूर यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत.
दाखल गुन्ह्यातील फिर्यादी नामे स्वाती भारत डुकरे रा, आंबी ता. राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचे दि२७जून रोजी १०:३० वा चे सुमारास पंढरपूर बस स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र किंमत ४५हजार रुपये चोरी केले होते,
सदर तपासादरम्यान २४ तासाच्या
आत पंढरपूर शहरातील ४० ते ४५ सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून चांदणी हिरु भोसले वय २० वर्ष, रा माळवाडी, वडगाव गुप्ता, ता जिल्हा अहिल्यानगर हिच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
असे एकूण ६७.४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत ९लाखतीस हजार- रुपये किमतीचे, शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे . टी वाय मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, राजेश गोसावी, शरद कदम, सिरमा गोडसे, उबाळे, सचिन हेंबाडे, पाटील, साहिल तांबोळी, कृष्णा पकाले, शहाजी मंडले, नवले, बजरंग बिचुकले, पोकों , हर्षद ठाकर, लक्ष्मण वाघमोडे यांनी केली.
संपादक .
चैतन्य उत्पात.


Comments
Post a Comment