पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश._भगीरथ भालके.


 पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश._भगीरथ भालके.

पंढरपूर (प्रतिनिधी)येत्या रविवारी दी.१२एप्रिल रोजी युवा नेते भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगर्स चे चेअरमन अनिल सावंत हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती शुक्रवार दी १०एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी दिली,

भगीरथ भालके यांनी सांगितले स्वर्गात आमदार भारत नाना भालके यांच्या शिकवणुकी प्रमाणे मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील जनतेशी,कार्यकर्त्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे,

रविवारी दुपारी दोन वाजता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असून या कार्यक्रमास सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या सर्वांनी उपस्थित रहावे,

तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये कोणतेही गैरसमज किंवा वाद नाहीत, हम सब एक है, असा संदेश भालके आणि सावंत यांनी दिला,

नगरसेवक नागेश भोसले हे सुद्धा पुढच्या वेळी आमच्या सोबत दिसतील, असे अनिल सावंत यांनी म्हटले 

तर पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे भालके यांनी सांगितले. यावेळी भालके आणि सावंत गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.