सरगम चौक येथे ए टी एम मशीन फोडताना आरोपीस रंगेहाथ पकडले.


 सरगम चौक येथे ए टी एम मशीन फोडताना आरोपीस रंगेहाथ पकडले,

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ए.टी. एम. फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना रंगे हाथ पकडून समाजामध्ये पोलीसांची प्रतिमा उंचावून उल्लेखनीय कामगिरी केली.


. अतुल कुलकर्णी  पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण,  प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण यांचे सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्हयातील जबरी चोरीस प्रतिबंध करणेच्या आदेशान्वये . सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे,  पंढरपुर विभाग पंढरपुर . दशरथ वाघमोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर पोलीस यांनी  गुन्हयातील आरोपी - सरोजकुमार नारायणकुमार दास, वय. ४१ वर्षे, मुळ रा. ओरिसा सध्या रा. इसबावी, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर हा दिनांक ०५एप्रिल रोजी पहाटे ०३/३० वा.चे सुमारास सरगम चौक पंढरपूर येथील एस. बी. आय बँकेचे ए. टी. एम मशीन फोडताना   पोलीसांनी त्यास रंगेहाथ पकडल्याने पोलीसांचे सतर्कतेमुळे गंभीर स्वरूपाचा होणारा जबरी चोरी सारखा गुन्हा घडण्यास प्रतिबंध लागला आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक. प्रितमकुमार यावलकर, सहा. पोलीस अधीक्षक, पंढरपूर विभाग . प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,  दशरथ वाघमोडे, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक  नितीन जगताप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गोसावी,शरद कदम,  सिरमा गोडसे,  सचिन हेंबाडे,  सोमनाथ पाटील,  साहिल तांबोळी,  कृष्णा पकाले,  शहाजी मंडले,  दिपक नवले, /बजरंग बिचुकले, 

 हर्षद ठाकर यांनी केली आहे.

संपादक 

चैतन्य उत्पात.

Comments