सौ मीरा ताशी उत्पात या सिद्धहस्त लेखिका प्रवचनकार दोन पुरस्कारांनी सन्मानित.


 सिद्धहस्त लेखिका प्रवचनकार सौ मीरा ताशी दोन पुरस्कारांनी सन्मानित.

पंढरपूर (प्रतिनिधी)पंढरपूर येथील सिद्धहस्त लेखिका,प्रवचनकार सौ मीरा ताशी उत्पात यांना दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

मूळच्या पंढरपूर येथील माहेरवाशीण असलेल्या सौ मीरा ताशी या सध्या कोल्हापूर येथे असतात,

अफाट वाचन आणि व्यासंग यांनी समृद्ध मीरा ताशी वेगवेगळ्या वृत्तपत्रात दर्जेदार लिखाण करतात,

दैनिक तरुण भारत संवाद, गोफण वेब पोर्टल वर त्यांचे लेख वाचकांना खूप आवडतात, दैनिक तरुण भारत संवाद मधील

आषाढी वारी विशेषांकात त्यांची लेखमाला प्रचंड लोकप्रीय ठरली होती.

अहिल्यानगर येथे ए आर न्यूज चॅनेल यांच्या वतीने काव्यलेखन आणि प्रवचन यासाठी पुरस्कार बहाल करण्यात आला तर वाई येथील विद्यानिकेतन या शैक्षणिक संस्थेच्या वतीने साहित्य लेखनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.

सौ मीरा ताशी या श्री रुक्मिणी स्वयंवर कथा तसेच श्रीमद् भागवत यावर प्रवचन, व्याख्यान देत असतात.

त्यांच्या या अनमोल यशाने पंढरपूर येथील उत्पात समाज बांधवात त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

गोफण वेब पोर्टल आणि उत्पात समाजाच्या वतीने सौ मीरा ताशी उत्पात यांचे अभिनंदन आणि पुढील दैदिप्यमान वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.