जातीभेद निर्माण करणाऱ्या किन्नर व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी जोगती संघटनेचे निवेदन.


 जातीभेद निर्माण करणाऱ्या किन्नर व्यक्तीवर कारवाई करण्याची जोगती संघटनेची मागणी.

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर येथील किन्नर वैष्णवी वसंत वाघमारे तसेच किन्नर समाजाविरूध्द जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पंढरपूर येथील किन्नर समाजातील मंडळींनी व जोगती संघटनेच्या वतीने उप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना निवेदन देऊन जातीभेद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिपाशा उर्फ आकाश राजू मणिकम यांच्या वर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी यल्लम्मादेवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष परसु नाना हणमंत पवार उपस्थित होते.

 पंढरपूर येथे राहणाऱ्या किन्नर वैष्णवी वसंत वाघमारे तसेच किन्नर समाजाविरूध्द जबरदस्तीने जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे. पुणे येथील किन्नर बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम (रा. धावजी पाटील निवास, गुरूनानक कॉलनी, कात्रज, पुणे) ही व्यक्ती जाणीव पुर्वक किन्नर समाजामध्ये मतभेद निर्माण करून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करीत असल्याची माहिती मिळत आहे.


किन्नर समाज हा परंपरेने गुण्यागोविंदाने, एकोप्याने व शांततेत राहणारा समाज आहे. मात्र सदर व्यक्तीकडून विविध ठिकाणी समाजामध्ये भडकावू विधान करून जातीय भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे किन्नर समाजामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नाशिक येथे देखील गुण्यागोविंदाने राहणाऱ्या किन्नर समाजामध्ये बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम यांनी जातीवाचक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे समाजातील ऐक्य धोक्यात येत असून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे.


तसेच पंढरपूर येथील किन्नर वैष्णवी वसंत वाघमारे यांच्याबाबत देखील वाद निर्माण करून किन्नर समाजामध्ये अनावश्यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण किन्नर समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून किन्नर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या किन्नर बिपाशा उर्फ आकाश राजू माणिकम यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा प्रकारचे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, ही मागणी सर्व

तृतीयपंथी, जोगती, आराधी व इतर समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

संपादक.

चैतन्य उत्पात.


Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.