कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्रीकांत महाजन बडवे आणि गायक विनोद शेंडगे यांचा सत्कार.


 कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने श्रीकांत महाजन बडवे व गायक विनोद शेंडगे यांचा सत्कार.

पंढरपूर (प्रतिनिधी)कला साधना सांस्कृतिक मंडळ पंढरपूरचे संस्थापक, अध्यक्ष श्री. श्रीकांत (दादा) बडवे -महाजन यांचा वाढदिवस   व पंढरपुरातील प्रसिद्ध गायक श्री. विनोद जी शेंडगे यांना शिवरंजनी कला गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कला साधना सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने दोघांचाही यथोचित सन्मान करण्यात आला .

याप्रसंगी  मार्गदर्शक आदरणीय मा. आमदार. श्री. प्रशांत  परिचारक (मालक) व सर्व कला साधना मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

आ. प्रशांत परिचारक यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

श्रीकांत महाजन बडवे यांनी चित्रपट, नाट्य, सिरीयल मध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे.

तसेच कला साधना या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अनेक कलाप्रेमी,, आपल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेली दिग्गज मंडळीचा सत्कार गौरव समारंभ करून सन्मान केला आहे.

यावेळी सुप्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ किरण बहिरवाडे, डॉ अभिजीत माचनुरकर , बिपीन परचंडे , ज्ञान प्रसाद अकॅडमी चे प्राचार्य प्रसाद परिचारक. प्रा. मंदार परिचारक सर, अमृत पेनुरकर, अरिहंत कोठाडिया, पत्रकार चैतन्य उत्पात,अमर चव्हाण, बाळू थोपटे, विजय सगर आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.