स्थितप्रज्ञ धीरोदात्त व्यक्तिमत्व डॉ सौ सुजाता गुंडेवार.


 स्थितप्रज्ञ धीरोदात्त व्यक्तिमत्व डॉ सौ सुजाता गुंडेवार._

पंढरपूर येथील सुप्रसिद्ध नामांकित स्त्री रोगतज्ञ सौ सुजाता गुंडेवार यांचे नुकतेच निधन झाले,

वयाच्या ६७व्या वर्षी जाणे हे अकालीच आहे,

एक स्त्री रोगतज्ञ म्हणून आपली डॉ या नात्याने जबाबदारी पार पाडत असताना कोणताही गर्व किंवा रुबाब कधीच त्यांच्या वागण्यात दिसला नाही, आमच्या पां. तु उत्पात कुटुंबाशी अत्यंत मधुर आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले होते,

आमचा आनंद काका हा डॉ अजित गुंडेवार यांचा जवळचा मित्र, आणि डॉ विवेक गुंडेवार हे अजित काका यांचे ज्येष्ठ चुलत बंधू व त्यांच्या पत्नी सौ सुजाता गुंडेवार, मात्र त्यांनी आमच्या कुटुंबीयांशी खूप आपुलकीचे नाते जपले,

कीतीही क्रिटिकल परिस्थिती असली तरीही डॉ सुजाता गुंडेवार यांच्या कडे त्याची मात्रा असे,

आमच्या घरातील सगळी बाळंतपण गुंडेवार हॉस्पीटल मध्ये झाली.१९९७ते २०२३या पंचवीस वर्षात डॉ सुजाता गुंडेवार आणि परिवाराने वैद्यकीय सेवा दिली, एकदा तर खूप बाका प्रसंग आला होता, आमची पुतणी 

 अपूर्वा हिच्या जन्मावेळी नाळ गळ्याभोवती गुंडाळली गेली होती, अहिल्यानगर  (अहमदनगर)येथे, येथील डॉ नी हात टेकले, मात्र डॉ सुजाता गुंडेवार यांनी पंढरपूर हून एस टी डी कॉल वरून तेथील डॉ ना मार्गदर्शन करत डिलिव्हरी सुखरूप करण्यास सक्षम मदत केली, अक्षरशः माता रुक्मिणी च्या रूपात त्या धावून आल्या, अजून एक 

गुंतागुतीची स्थिती असूनही 

सुखरूप शस्त्रक्रिया केली,

रुग्णसेवा ही एक जबाबदारी एक कर्तव्य म्हणून नेहमीच सौ सुजाता गुंडेवार आणि त्यांचे कुटुंब केवळ पंढरपूर नव्हे तर राज्यात आदर्श कुटूंब आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही,

व्यापारी  समाजातील असूनही वैद्यकीय अशा बौद्धिक व रिस्की पेशात झोकून देऊन स्वतःला सिद्ध केले आहे.

१९८४सालापासून रुग्णसेवा करीत तालुक्यात त्यांनी मोठे नाव केले आहे,

सुरुवातीला महाद्वार येथील शॉपिंग सेंटर मध्ये हॉस्पिटल सुरू करून हजारो माता भगिनी यांना उत्तम सेवा दिली, त्या काळात कायनेटिक होंडा स्कूटर वरून रुबाबात येणाऱ्या डॉ सुजाता गुंडेवार 

अनेकांच्या स्मरणात आहेत, उच्च आणि नीटनेटके राहणीमान, प्रगल्भ, जबाबदार व्यक्तिमत्व असल्याने हॉस्पीटल मध्ये दरारा असायचा, वैद्यकीय क्षेत्रात असूनही केवळ पैसा कमविणे हा त्यांचा उद्देश कधीच नव्हता, डॉ विवेक गुंडेवार हे बालरोग तज्ज्ञ 

अनेकदा रात्री अपरात्री घरातील बालकांना ऍडमिट केले तरीही उत्तम सेवा देऊन खडखडीत बरे केले ,

काका मितभाषी आणि विनम्र, त्यांच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट म्हणजे काळजी नसायची, डॉ अजित गुंडेवार आणि डॉ अमित गुंडेवार यांच्या शी देखील जिव्हाळ्याचे नाते आहे, सुजाता काकु एवढी बिझी असूनही लायन्स क्लबमध्ये सक्रिय राहून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले, सौ सुजाता गुंडेवार 

डॉ असूनही मित्रमंडळींच्या 

घरगुती,हळदीकुंकू,डोहाळजेवण अगदी आमच्या घरातील नाथषष्ठी कार्यक्रमातही वेळात वेळ काढून येत असे.

आज त्यांच्या अकाली जाण्याने घरातीलच कोणी तरी गेले असल्याची उणीव जाणवत आहे, या दुःखातून सावरण्यासाठी गुंडेवार कुटुंबियांनी परमेश्वर बळ देवो,

आमच्या उत्पात आणि गोफण परिवाराच्या वतीने डॉ सुजाता गुंडेवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली,

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

  1. गुंडेवार कुटुंब आणि पां.तु.उत्पात परीवार यांचे अतुट नाते आहे कांहीं नाती रक्ताची असतात तर कांहीं त्या पलीकडची असतात ईश्वर सुजाता गुंडेवार यांना सद्गती देवो हीच प्रार्थना

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे अपघात, टिपर धडकेत बापलेक जागीच ठार

ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाने भारावून गेले ब्रिलियंटस अकॅडमी मधील विद्यार्थी.