डॉ बसवराज सुतार यांच्या अद्यावत ज्ञानाचा उपयोग पंढरपूर कर नागरिकांनी करून घ्यावा._श्री उमेश परिचारक.
डॉ. बसवराज सुतारांच्या अद्यावत ज्ञानाचा पंढरपुरकरांनी उपयोग करुन घ्यावा..... उमेश परिचारक!
पंढरपूर
(प्रतिनिधी)
डॉ बसवराज सुतार यांच्या अद्यावत ज्ञानाचा उपयोग पंढरपूर येथील नागरिकांनी करून घ्यावा असे प्रतिपादन उमेश परिचारक यांनी केले.पंढरपूर येथील डॉ. बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन हार्ट केयर या हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्प दरात उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा निर्माण व्हावी या उदात्त हेतूने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटन प्रसंगी परिचारक बोलत होते. परिचारक आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, एनजोग्राफी, एन्जोप्लास्टी, बायपास हार्ट सर्जरी यासाठी पूर्वी सोलापूर, पुणे, मुंबई येथे जावे लागत होते पण डॉ. सुतारांच्या अद्यावत ज्ञानाने ती उणीव भरुन निघाली आहे. डॉ. सुतार आपल्या भाषणात म्हणाले की, मागील वर्षभरात पंढरपुरकरांनी अलोट प्रेम दिले. त्यांच्या प्रेमामुळे पुढे अजून अत्याधुनिक सेवा करण्यासाठी प्रयत्नशील असेन.
कलासाधना अध्यक्ष श्रीकांत महाजन बडवे यांनी सुतार डॉक्टरांचा वैद्यकीय क्षेत्रातील सुवर्ण पदकापर्यंतचा खडतर प्रवास वर्णन केला. तसेच रणांगणात फौजी जीव देतो पण नाव त्याचे कधीही होत नाही, ताजमहाल रात्रंदिवस कारागीर आपल्या कौशल्याने साकारतात पण नाव मात्र शहाजानच होत तस प्रत्येक राजकीय यशा मागे उमेशजी परिचारक किंग मेकरची भूमिका बजावतात व नामानिराळे राहतात, असे म्हणताच उपस्थितात एकच हशा व टाळ्या पिकल्या.जुन्या पिढीतील तज्ञ डॉक्टर मा. वि. अ. वोहरा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान व अत्याधुनिक मशिनरी असेल त्याच्या ज्ञानाचा खूप चांगला फायदा रुग्णांना होतो व डॉ. सुतार यांच्या कडे या दोन्ही गोष्टी असल्याने ते अधिक चांगल्या सेवा देतील असा विश्वास व्यक्त केला. हा कार्यक्रम हृदयस्पंदन हार्ट केयर, राहीरकर बिल्डिंग, चंकेश्वरा मेडिकलच्या मागे, सावरकर चौक येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र कांबळे,ओम सुतार, ईरण्णा सुतार, राजेंद्र माळी, राजकुमार आटकळे, राजकुमार शहा, कोमल पांढरे, तंजिला शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शिरसट, नगरसेवक इब्राहिम भोरी, नगरसेवक अमोल डोके, नगरसेवक राजु सर्वगोड , अर्बन बॅंकेचे संचालक गणेश सिंघन, राजु खोबरे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बडवे महाजन यांनी केले तर आभार डॉ. उमाश्री दावणगीरे-सुतार यांनी मानले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment