पंढरीत मंगळवारी उमेश परिचारक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन.
*पंढरीत मंगळवार दि. २५ रोजी उमेश परिचारक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन!*
प्रतिनिधी. पंढरपूर येथील डॉ. बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन हार्ट केयर या हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्प दरात उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा निर्माण व्हावी या उदात्त हेतूने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबीराचे उद्घाटन युरोपियन शुगर चेअरमन मा. उमेशजी परिचारक यांच्या शुभहस्ते व पंढरीतील जुन्या पिढीतील तज्ञ डॉक्टर मा. वि. अ. वोहरा यांच्या अध्यक्षतेखाली, हृदयस्पंदन हार्ट केयर, राहीरकर बिल्डिंग, चंकेश्वरा मेडिकलच्या मागे, सावरकर चौक येथे संपन्न होणार आहे.
या शिबीरात हृदयाच्या आवश्यक असणा-या टू डि इको, इसिजी, सीबीसी/एच बी/एसी, फास्टींग लिपिड प्रोफाईल, सिरम क्रिएटीनीन या सर्व टेस्ट अत्यल्प दरात केल्या जाणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार तज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला मोफत दिला जाणार आहे.
तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बसवराज सुतार यांच्या वतीने करण्यात येत आहे. शिबीरात ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी ७७७७९८३०४३ या फोन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन डॉ. सुतार यांनी केले आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment