लोखंडी पहारीने हल्ला करून चेन हिसकावल्या प्रकरणी तीन जणांना जामीन मंजूर.


 लोखंडी पहारीने जखमी करून सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावून घेतल्या प्रकरणी तीन जणांना अटकपूर्व जामीन मंजूर.

 पंढरपूर(प्रतिनिधी )_


पंढरपूर - लोखंडी पहारीने जखमी करुन सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावून घेतल्या प्रकरणी नामदेव बजरंग रुपनर, . राहूल नामदेव रुपनर, व. गिरीधर तानाजी मस्के उर्फ बबलु मस्के सर्व रा. तिसंगी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री सुरवसे साहेब यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.


सदरील घटनेची हकीकत अशी की, सदर घटनेतील फिर्यादी हा आप्पासो दादा येळे हा आहे. यातील फिर्यादी हा वरील ठिकाणी आई मैनाबाई वडिल दादा, पत्नी दिपाली, तीन मुले रिया, श्रेया व प्रणव असे एकत्रात राहणेस असून फिर्यादी हा शेती करून कुटूंबाची उपजिवीका भागवतो. फिर्यादी याच सन २०१८ साली मौजे तिसंगी येथील नामदेव रूपनर यांची मुलगी दिपाली हिचेबरोबर लग्न झालेले होते. मागील तीन वर्षापासून आमचेत व सासरे यांचेत किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. तेव्हापासून आमचे एकमेकांकडे येणेजाणे नाही.


दिनांक २४जानेवारी  २०२५ रोजी सकाळी १०.०० वा चे सुमारास फिर्यादीची साच बायडाबाई ही आमचे घरी आली होती. त्यावेळी सासू बायडाबाई हिने पत्नी दिपाली हिस "नाराज आहेस, काय झाले आहे असे विचारले असता पत्नी दिपाली हिने "माझेत व पती आप्पा यांचेत किरकोळ वाद झाला आहे असे सांगितले" त्यावेळी सासू बायडाबाई हिने "पत्नी दिपाली हिला माझे सोबत पाठवा. "असे म्हणाले नंतर मी त्यांना, तुमची मुलगी घेवून जावा व माझे मुलांना इथेच राहू दया." असे म्हणालो. त्यानंतर सायंकाळी ५.०० वा चे सुमारास फिर्यादीचे सासरे, नामदेव रूपनर, मेव्हणा राहूल रूपनर, बबलु मस्के, अमोल खरात, संभाजी महारनवर व इतर दोन अनोळखी इसम तेथे

 आले. त्यावेळी फिर्यादीचा सासरा नामदेव याने मला, "आमचे मुलीला आमचेसोबत पाठवा" असे म्हणाला त्यावेळी मी त्यांना, "तुमची मुलगी घेवू जावा व माझे मुलांना येथेच राहू दया" असे म्हणालो असता सासरे नामदेव मेव्हणा राहूल व बबलू मस्के यांनी मला तु कसा काय पाठवत नाही ते बघ असे म्हणून शिवीगाळी दमदाटी करून हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केल त्यावेळी मेव्हणा राहूल रूपनर याने तेथे पडलेली लोखंडी पहार उचलून म छातीवर मारून जखमी केले आहे. आमचे भांडण चालू असताना सासरा नामदेव रूपनर याने फिर्यादीचे खिशातील रुपये ३२,०००/- रूपये व गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन तोडून हिसकावून घेतली आ त्यावेळी फिर्यादी याची आई मैनाबाई ही सोडवणेसाठी मध्ये आली असता तिलाही सासरे नामदेव रूपनर व राहूल रूपनर यांनी शिवीगाळी दमदाटी करून ढकलून खाली पाडले. त्यावेळी त्याचे सोबत आलेले अमोल खरात संभाजी महारनवर व इतर दोन अनोळखी ईसमांनी आमची भांडणे सोडवासोडवी करणेचा प्रयत्न केला, त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीची आई मैनाबाई असे सर्वजण मिळून तक्रार देणेसाठी पोलीस ठाणेस आलो असत पोलीसांनी आम्हाला दवाखाना यादी दिलेनंतर आम्ही उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे जावून औषध उपचार करून पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे.


 पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल करणेत आलेला आहे.


सदर प्रकरणात अर्जदार / आरोपी यांचे वतीने अॅड. संदिप कागदे यांनी युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून अर्जदार / आरोपी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करणेत आला.

सदर प्रकरणात  आरोपींचे वतीने

अॅड. संदिप कागदे, अॅड. काकासो केंगार यांनी काम पाहिले.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.