खा. प्रणिती शिंदे यांनी दिली डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन बाल रुग्णालयात भेट.
खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली डॉ शीतल शहा यांच्या रुग्णालयास भेट.
पंढरपूर (प्रतिनिधी)सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथे बालकांचे देवदूत अशी ओळख असलेल्या डॉ शीतल शहा यांच्या नवजीवन बाल रुग्णालयास भेट दिली.
यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी डॉ शीतल शहा यांच्या शी बालकांचे विविध आजार,त्याची कारणे, भारतात तसेच महाराष्ट्र राज्यात होणारे आजार, त्याचे लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम, हे रोग होऊ नये यासाठी आवश्यक काळजी, यावर चर्चा केली.
तसेच नवजीवन बाल रुग्णालयात देण्यात येणाऱ्या विविध सोयी,
बालकांसाठी सुसज्ज असे आय सी यू , ईतर विशेष उपचार पद्धती, प्रॅक्टिस मधील विविध रोचक घटना,अनुभव
भारतीय रुग्णसेवेचा बदलते स्वरूप,आव्हाने
उपचार पद्धती मधील बदल
यावर सखोल चर्चा केली.
खा शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात आरोग्य विषयी विविध योजना,अत्याधुनिक तंत्रज्ञान आणणार असल्याचे संकेत दिले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पंढरपूर येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ शीतल शहा यांनी सुरुवातीला प्रणिती शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment