टँकर ने मागून धडक दिल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार.
ब्रम्हपुरी जवळ सिमेंट वाहतूक करणार्या टँकरने ट्रॅक्टरला पाठीमागून ठोकरल्याने ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू
एकाच आठवड्यातील दुसरी घटना,अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल...
मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील ब्रम्हपुरी जवळ भरधाव वेगाने जाणार्या सिमेंट वाहतूक करणार्या टँकरने रस्त्यावरुन ऊस घेवून जाणार्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक देवून गोरख मल्हारी बोडरे (वय 36,रा.अर्धनारी,ता.मोहोळ) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात टँकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.10 जानेवारीच्या पहाटे 3 वाजता मंगळवेढा ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील ब्रम्हपुरी हद्दीतील शिरसट वस्तीजवळ ऊस घेवून जाणारा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.13 ए.8789 याला सिमेंट वाहतूक करणारा टाटा कंपनीचा टँकर क्रमांक एम.एच.13 ए.एक्स 4067 या वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन ट्रॅक्टर चालक गोरख बोडरे याला गंभीर जखमी केले व त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला असल्याची फिर्याद धुळाप्पा तुकाराम कोकरे (रा.अरळी) यांनी दिल्यावर अज्ञात टँकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान टँकरचा वेग एवढा मोठा होता की, ट्रॅक्टरच्या इंजिनचे अक्षरश: तुकडे तुकडे होवून रोडच्या खाली जावून पलटी झाल्याचे दिसून येत होते. तसेच दुसर्या पाठीमागील ट्रेलरला जोराची धडक दिल्याने टँकर सह ट्रॅक्टर रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याचे चित्र होते. या अपघाताचे वृत्त समजताच राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस पथक तात्काळ दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक गणपत माने,सहाय्यक फौजदार दत्तात्रय घंटे,पोलीस अंमलदार सुनिल घोळसगावकर,दत्तात्रय बोरकर आदींचे पथक घटनास्थळी दाखल होवून त्यांनी रस्त्यावरची वाहतूक सुरळीत केली. त्याच बरोबर इंचगाव टोल नाक्यावरील हायवे पेट्रोलिंग टीम मधील कंट्रोल रुम अधिकारी धनाजी माने,रोड पेट्रोलिंग अधिकारी संतोष नाईकवाडी,प्रदीप व्हराडे, दत्तात्रय घुले,मदतनीस अमीर पटेल व अॅम्ब्यूलन्स टीम यांनी तात्काळ घटनास्थळी येवून क्रेनच्या सहाय्याने रस्त्यामधील अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतूकीस मार्ग मोकळा करुन दिला.
फोटो ओळी
ब्रम्हपुरी जवळ सिमेंट वाहतूक करणारा टँकरने पाठीमागून ट्रॅक्टरला ठोकरल्याने दोन्ही वाहने दुभाजकावर चढले तसेच दुसर्या छायाचित्रात ट्रॅक्टरचे तुकडे झाल्याचे दिसत आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment