आढीव येथे पंच कल्याणक महामहोत्सवाचे आयोजन.
*आढीव् येथे पंच कल्याणक महामहोत्सवचे आयोजन.*
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील आढीव या गावात डॉ शितल शहा यांचे फार्महाऊस, तपोवन येथे पंचकल्याणक महामहोत्सव चे भव्य आयोजन दि शनिवारी १ फेब्रुवारी ते बुधवार दि.५फेब्रुवारी या कालावधीत कऱण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ शितल शहा यांनी दिली.
या धार्मिक कार्यक्रमास पंढरपूर पंचक्रोशितील एक ते दीड हजार भक्त श्रवण करण्यासाठीं उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात मुनींचे प्रवचन, स्वाध्याय, पुजा व सांस्कृतिक व विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत.या कार्यक्रमास परिसरातील लोकांनी आवर्जून उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ शितल शहा यांनी केले
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment