युवकाचे जबरदस्तीने अपहरण करणाऱ्या आरोपींना केवळ चार तासात केले जेरबंद.
युवकाचे जबरदस्तीने अपहरण करणाऱ्या आरोपींना केवळ चार तासात केले जेरबंद,
तालुका पोलिसांची कारवाई.
पंढरपूर (प्रतिनिधी)_
पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील रोहित वायदंडे याला जबरदस्तीने स्विफ्ट कार मध्ये बसवून अपहरण केलेल्या आरोपी आबा कसबे बबलू देठे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल दोन्ही आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी केवळ चार तासात जेरबंद केले आहे.
तालुका पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तत्पर
हालचाल करत आरोपींना पकडले.
यातील आरोपी हे खेड शिवापुर जिल्हा पुणे येथील वीट भट्टी चालक असून फिर्यादीचा मुलगा हा वीट भट्टी वरती कामाला होता त्याने आरोपी कसबे याच्याकडून पाच ते सहा लाख रुपये उचल घेतली होती आणि काम सोडून निघून आला होता. त्यानंतर त्याला आरोपी आणि वारंवार फोन करून कामासाठी व पैशासाठी तगादा लावल्यानंतर त्याने जाण्यास नकार दिल्यानंतर आरोपी यांनी फिर्यादीस गाडीमध्ये घालून जबरदस्तीने घेऊन जाताना तिने तिच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पुढे कोणतेही अप्रिय घटना होऊ नये म्हणून तात्काळ स्वतः आरोपींच्या गाडीचा शोध घेऊन कळ्या रंगाची स्विफ्ट कार एम एच १२ डी एस ७०६५ ही गाडी किंमत रुपये चार लाख रुपयाचा मुद्देमाल सदर तपासकामी तपासकामी जप्त केले असून आबा उर्फ अभिजीत कसबे राहणार खेड शिवापुर जिल्हा पुणे व रणजीत देडे रा. धाराशिव या दोन आरोपींना मोडनिंब गावाजवळ गाडी बंद झाल्याने आरोपी पलायन करताना ताब्यात घेतले.आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे व फिर्यादी रवींद्र ईश्वर वायदंडे यांचा मुलगा रोहित रवींद्र वायदंडे वय २४ वर्ष राहणार देगाव तालुका पंढरपूर यांना याची आरोपीकडून चार तासात पंढरपूर तालुका पोलिसांनी सुटका केलेली आहे . आरोपींना पुणे सोलापूर रोडवर ताब्यामध्ये घेऊन त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सदस्य ही घटना घडल्यानंतर रात्री एक ते सकाळी आठ वाजेपर्यंत पंढरपूर तालुका पोलिसांनी अतिशय तत्परतेने सदरच्या घटनेचा तपास करून आरोपींना अटक केल्याबाबत देगावच्या ग्रामस्थांनी पंढरपूर तालुका पोलिसांचे कौतुक केले आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक , प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी , अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर एपीआय विश्वास पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमंत शिंदे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम शिंदे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुजित उबाळे पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल खेडकर यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment