देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने पंढरीत पेढे वाटप.


 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने पंढरीत पेढे वाटून आनंद.

 पंढरपूर (प्रतिनिधी)_मुंबई येथील आझाद मैदान येथे राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच पंढरपूर येथील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा करून पेढे, जिलेबी वाटप करून फटाक्यांची आतषबाजी केली.

भारतीय जनता पार्टी व महायुतीचे  . देवेंद्र फडणवीस  महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

यावेळी पंढरपूर मध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते,

महिला मोर्चा शहर कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने श्री.पांडुरंग रुक्मिणी मातेस तुळशी अर्चन करून पेढ्याचा नैवेद्य दाखवून,

भाविकांच्या मध्ये पेढे वाटून  नामदेव पायरी, पश्चिमद्वार  येथे जल्लोष करून आनंद साजरा केला.

यावेळी,

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्य.शकुंतला नडगिरे,

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य व ज्येष्ठ नेते आदरणीय . बाबासाहेब बडवे,

भाजप पंढरपूर शहर सरचिटणीस .श्याम तापडिया,

भाजप पंढरपूर शहर सरचिटणीस .आदित्य जोशी,

भाजप महिला मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्षा डॉ.प्राजक्ता  बेणारे,

भाजप जिल्हा उपाध्यक्ष सौ.अपर्णा  तारके,

भाजप महिला मोर्चा पंढरपूर शहर अध्यक्ष डॉ.सौ.ज्योती  शेटे 

त्याच सोबत भाजप महिला पदाधिकारी सौ.सचिता  सगर,सौ.ज्योती  जोशी, पार्थ बेणारे  आदी उपस्थित होते.

यावेळी शेकडो भाविकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.