पंढरपूर तालुक्यात ३ लाख २७हजार रुपयांची अवैध दारू जप्त.


 पंढरपूर पोलीसांची  अवैध दारू विक्रीवर कारवाई

3,27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त 



पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रांजणी या गावी २३

डिंसेबर  रोजी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी

भोसले यांना

मिळालेल्या माहितीनुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एच.डी.पी.ओ सोलापूर कार्यालय स्टॉप व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन स्टाफ यांच्या एकत्रित कारवाई करीत  मौजे रांजणी गावात सदर कारवाई करण्यात आली.


यावेळी घटना स्थळी  प्रदीप अवताडे यांचे राहते घरी कारवाई वेळी जिन्याखाली देशी दारूचे एकुण ९६ बॉक्स अवैधरित्या बाळगलेल्या स्थितीत आढळून आले आहेत  सदर आरोपी प्रदीप अवताडे यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.तसेच सर्व ९६ बॉक्स दारू जप्त करण्यात आले असून सदर देशी दारूची एकूण किंमत

३,२७,००० ( तीन लाख २७ हजार रुपये) इतकी आहे.  सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,  उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस कॉन्स्टेबल रोंगे, ए एस आय तोडले, पोलीस हेडकॉन्स्टेबल रोकडे यांच्या पथकाने केली सदर कारवाई आहे.  

संपादक.

चैतन्य उत्पात.

Comments

Popular posts from this blog

पंढरीत भर वस्तीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या बिल्डींगवर धाड.

ज्ञानप्रसाद अकॅडमी चे व्हि डी परिचारक सर पुणे येथील डी वाय पाटील विद्यापीठाकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कॉरिडॉर च्या पैशावरून वाद, काका काकू वर पुतण्याने केला चाकूने जीवघेणा हल्ला.