पंढरपूर येथे आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस साजरा.
पंढरीत आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस साजरा
पंढरपूर (प्रतिनिधी)_पंढरपूर येथे
शनिवार दि २१ डिसेंबर रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस निसर्गोपचार केंद्र त्याचबरोबर हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिटेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे मोहिते हॉस्पिटल हॉल मध्ये सकाळी साडेसहा वाजता पार पडला . यानिमित्ताने ध्यानाचे महत्त्व आणि त्यामुळे जीवनामध्ये होणारा अमुलाग्र बदल त्याचबरोबर आपल्या भारतीय प्राचीन ऋषीमुनींनी संपूर्ण विश्वाला दिलेला एक अनमोल ठेवा म्हणजे ध्यान होय. ध्यानाच्या माध्यमातून आपण शारीरिक आणि मानसिक अध्यात्मिक विकास चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि आपल्या परिसरात प्राणाहुती संप्रेषित हृदयावरती ध्यान करण्याचे मार्गदर्शन आज या ठिकाणी पार पडले . या निमित्ताने ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या प्रमुख डॉ. ज्योती शेटे यांनी या ध्यान योगाचे आयोजन केलं होते. डॉ ज्योती शेटे यांनी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात योगा केल्याने कोणते सकारात्मक बदल होतात,
आरोग्याचे फायदे, याचे महत्व विषद केले.
यावेळी या ध्यान शिबिराचा ज्योतिर्मय योग व निसर्गोपचार केंद्राच्या योग साधिकांनी याचा लाभ घेतला.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment