माताजी निर्मला देवी प्रशालेत दंत आरोग्य विषयी मार्गदर्शन.
शनिवार 'विना दप्तर 'शाळा या उपक्रमांतर्गत
दातांची घ्यायची काळजी या विषयावर मार्गदर्शन
मार्गदर्शक डॉक्टर अनुराधाताई तुषार खंडागळे.
पंढरपूर: (प्रतिनिधी)श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिर पंढरपूर येथे संस्थापिका सौ.सुनेत्राताई पवार यांच्या संकल्पनेतून मुलांच्या दातांच्या समस्या व उपाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेने करण्यात आली. डॉक्टर अनुराधाताई यांचा सन्मान सौ गावडे यांनी शाल, रुमाल गुच्छ यांनी केला. आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर अनुराधाताई म्हणाल्या " दिवसातून दोन वेळा स्वच्छ दात घासावेत. त्याचबरोबर काही अन्नपदार्थ खाल्ल्यास लगेच चूळ भरावी. वर्षातून एकदा दातांच्या डॉक्टरांकडे आपले दात दाखवावेत.
प्रश्नोत्तर मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. चि. अर्णव शिंदे श्लोक पतंगे, दिव्या पतंगे, आरोही खंकाळ, तनिष्का डांगे यांनी डॉक्टरांची मुलाखत घेतली.दातातून घाण वास का येतो ? दातांना कॅप का लावतात? रूट कॅनल म्हणजे काय? कोणत्या व्यसनामुळे दातांचे आजार होतात? तोंडाच्या कॅन्सर कशामुळे होतो? त्यांची लक्षणे कोणती ? आपले वैद्यकीय शिक्षण कोठे झाले ? आपण कोण कोणत्या सामाजिक संघटनेत काम करता ? वैद्यकीय व्यवसाय सोडून आपणास कशाकशाची आवड आहे ?
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलनदीप टापरे सर, यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश आगवणे सर , प्रमोद हुंगे सर, गावडे मॅडम व घुमटे मॅडम यांनी परिश्रम घेतले. आभार महेश भोसले सर यांनी मानले.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment