कला साधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने किल्ला स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दीपावली निमित्त घेतलेल्या किल्ला स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न!
पंढरपूर(प्रतिनिधी )_
गेली सतरा वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व इतिहासाचा प्रसार व प्रचार व्हावा या उदात्त हेतूने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कालच निधन झालेले जागतीक कीर्तीचे कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
सदर स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेतल्या होत्या. रोख रक्कम, संस्थेचे मानचिन्ह, सहभाग प्रमाण पत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पांडुरंग भवन येथे सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
सदरल कार्यक्रम ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण बडवे यांच्या अध्यक्षतेखाली सिंहगड इंजि.कॉलेजचे प्राचार्य मा. डॉ. कैलाशजी करांडे व पांडुरंग अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध बडवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना डॉ. करांडे आपल्या भाषणात म्हणाले की, कलासाधनाचा हा नवीन उपक्रम म्हणजे शिवरायांच्या विचारधारांचा खरा दीपोत्सव साजरा झाला असेच म्हणावे लागेल. भविष्यात अशा सर्व उपक्रमाला जास्तीत मदत माझ्या कडून मिळेल. या स्पर्धेचे परिक्षण इतिहास अभ्यासक तुकाराम चिंचणीकर, एडव्होकेट आशुतोष अनिलराव बडवे पाटील, जाणता राजा महानाट्य फेम वैभव जोशी, कलाशिक्षक अमित वाडेकर यांनी समर्थपणे केले त्याबद्दल स्पर्धेचे कार्याध्यक्ष अमरसिंह चव्हाण यांच्या हस्ते परिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तर यावेळी कलासाधनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बडवे महाजन यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचा शिवरायांची सिंहासनारूढ प्रतिमा देउन सत्कार करण्यात आला. यापुढेही विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे श्रीकांत बडवे महाजन यांनी सांगितले.
संस्थेचे नूतन सचिव ज्ञानेश्वर मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या मागील व भविष्यातील कार्याचा धावता आढावा घेतला. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सहसचिव अक्षय बडवे पाटील यांनी केले, सूत्रसंचालन सौ. मंदाकिनी देशपांडे मॅडम, यांनी केले तर आभार राजकुमार आटकळे यांनी मानले.
या स्पर्धेत शालेय गटात प्रथम क्रमांक कु. श्रेया माऊली डांगे, द्वितीय क्रमांक चि. दुर्वांकुर महेश बेणारे, तर तृतीय क्रमांक अथर्व अमोल हुंगे यांनी प्राप्त केला तर महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक उत्कर्ष खरात, द्वितीय क्रमांक कु. श्वेता घाडगे तर तृतीय क्रमांक ओम शिवाजी जाधव यांनी प्राप्त केला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलासाधनाचे अध्यक्ष श्रीकांत बडवे महाजन यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. विनायक परिचारक, ज्ञानेश्वर मोरे, अमर चव्हाण सर, अभियंता राजेंद्र माळी साहेब, रणजीत पवार, अरिहंत कोठाडिया, डॉ.किरण बहिरवाडे, अभिराज बडवे, प्रा. राजेंद्र मोरे, राजकुमार शहा, जगदीश खडके, बसवराज बिराजदार, महेश अंबिके, विष्णुकांत बोंबलेकर , अमृतभाई शहा, अनंता नाईकनवरे,महेश देशपांडे, नारायण बडवे आदी कला साधनाचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास परिसरातील स्पर्धक व अनेक मान्यवर नागरीक उपस्थित होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment