यंदाच्या आषाढी वारीत नऊ लाख बासष्ट हजार भाविकांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन.
यंदाच्या आषाढी वारी मध्ये नऊ लाख बासष्ट हजार भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन.
साडे आठ लाख बुंदी लाडू ची विक्री.
पंढरपूर प्रतिनिधी -
प्रतिनिधी पंढरपूर -यंदाच्या आषाढी वारी मध्ये नऊ लाख बाषष्ट हजार दोनशे 49भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले .
दि6ते 18जुलै या कालावधीत पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
चार लाख 14हजार 31भाविकांनी पदस्पर्श दर्शन तर पाच लाख 48हजार दोनशे अठरा भाविकांनी मुखदर्शन घेतले आहे.
एका मिनिटात तीस भाविकांनी मुखदर्शन घेतले असून दोन्ही प्रकारच्या दर्शनाची नोंद समिती ने बसविलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे घेण्यात आली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा प्रसाद म्हणुन बुंदी लाडू विक्री केली जाते, शुक्रवार दी 18तारखे पर्यन्त आठ लाख पन्नास हजार बुंदी लाडू ची विक्री आषाढी वारी कालावधीत झाली आहे.
तर एकादशी दिवशी प्रसाद म्हणुन राजगिरा लाडू दिला जातो.
राजगिरा लाडू ची केवळ 95हजार विक्री झाली आहे.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे होणारी विक्रमी गर्दी गृहीत धरून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 15लाख बुंदीचे लाडू तयार केले होते. तर राजगिरा लाडू 6लाख तयार केले होते.
संपादक.
चैतन्य उत्पात.

Comments
Post a Comment